Tuesday, April 21, 2026
HomeAgricultureकृषी विभागातील लिपिक संवर्गाचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

कृषी विभागातील लिपिक संवर्गाचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

Clerical cadre in the Agriculture Department protest for various demands

चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य लिपिक संवर्ग संघटना पुणे यांचे मार्फत सध्या राज्यभरातील कार्यालयात प्रलंबित मागण्यांसाठी विविध टप्प्यात आंदोलन सुरू आहे. Clerical cadre in the Agriculture Department protest for various demands

यात दिनांक 26 मे ते 28 मे दरम्यान काळी फित लाऊन काम करणे, 29 मे ते 30 मे तालुका तथा जिल्हा स्तरावर धरणे आंदोलन, 2 जून ते 4 जून लेखणी बंद आंदोलन, 5 जून पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे तर मागण्या मान्य न झाल्यास 17 जून पासून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दुचाकी अपघातात माय लेकीचा मृत्यू

राज्यभरातील कृषी विभागातील सुधारित आकृतीबंध मध्ये कृषी विभागातील लिपिक संवर्गीय अधिकारी कर्मचारी यांचा आकृतीबंध आयुक्तालय ते क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील कोणतेही पद कमी न करता संघटनेने सुचवलेल्या किफायतशीर व आर्थिक बचतीचा प्रस्तावास अंतिम मान्यता देण्यात यावी.
लिपिक संवर्गातील पदोन्नती स्तर कमी करण्यासाठी सुधारित आकृतीबंध मध्ये सहाय्यक अधीक्षक पद सुधारित मागणीनुसार कक्ष अधिकारी गट ब कनिष्ठ या पदांमध्ये समाविष्ट होण्याबाबत व पदनाम मध्ये बदल करण्यास मान्यता देण्यात यावी,
लिपिक संवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे सुधारित सेवा प्रवेश नियम तयार करावे,
लिपिक संवर्गीय प्रतिनियुतीचे पदे चिन्हांकित होऊन त्यास मान्यता देण्यात यावी,
वरिष्ठ लिपिक पदे 100% पदोन्नतीने भरण्याबाबत सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल करण्यात यावा,
सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्याचे सन 2011 पूर्वी 100% पदोन्नती पदे भरण्याबाबत सेवा प्रवेश नियम कार्यरत होते त्यानुसार सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ही 75 टक्के पदोन्नतीने व 25 टक्के पदे सरळ सेवेने भरण्याबाबत सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल करण्यात यावा, वेतनश्रेणीतील त्रुटी दूर व्हावेत आणि लिपिक संवर्गीय रिक्त पदे भरावीत या संघटनेच्या मागण्या आहेत.

खासदार धानोरकरांच्या चंद्रपूर च्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मागण्या

याच अनुषंगाने चंद्रपूर कृषी विभागातील लिपिक संवर्ग संघटनेमार्फत सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular