Vidarbha level OBC women’s convention in Chandrapur
चंद्रपुर :- ओबीसी महिलांचे प्रथमच विदर्भस्तरीय अधिवेशन माता महाकाली नगरी चंद्रपूर येथे होऊ घातले आहे. सदर अधिवेशन स्थानिक जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर बुधवार दिनांक ११ जूनला दुपारी १२ वाजेपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनाकरिता विदर्भातील सर्व जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरूपात सामाजिक चळवळीतील महिला उपस्थित राहणार आहेत. Vidarbha level OBC women’s convention in Chandrapur
या ओबीसी महिला अधिवेशनात महिलांशी निगडित विविध विषयांवर चर्चा करुन ठराव पारित करण्यात येणार आहे. ओबीसी समाजाकरीता केंद्र तथा राज्य शासनाकडून निघालेल्या शासन निर्णयाची माहिती देण्यात येणार आहे. हुंडाबळी ठरलेल्या स्व. वैष्णवीताई हगवणे व आजवर हुंडाबळी ठरलेल्या सर्व महिलांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येईल. हुंडाबळी तथा महिलांवरील अत्याचाराच्या न्यायालयीन केसेस फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी करण्यात येणार आहे. ओबीसी समाजातील अनिष्ठ परंपरा व महिलांवरील अन्यायकारक रूढींना बंद करण्याबाबत चर्चा करुन ओबीसी समाजाकरीता आदर्श आचारसंहिता तयार करण्यात येईल. सर्व क्षेत्रातील महिलांना समान संधी मिळावी यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी ठराव घेण्यात येईल. महिलांच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात येईल, ओबीसी समाजाच्या राज्य व केंद्र शासनाशी निगडीत मागण्यांवर चर्चा करुन त्यासंदर्भातही ठराव घेण्यात येणार आहे. तथा पुढील ओबीसी महिला अधिवेशन महाराष्ट्र स्तरावर घेण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. Model code of conduct to be made on social issues for OBC community
विदर्भस्तरावर ओबीसी महिलांचे अधिवेशन घेऊन सद्यस्थितीत महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी महिलांमध्ये जागृती निर्माण करणे, त्यांच्यात आत्मविश्वास जागवून, स्त्री सुरक्षितता व स्त्री-पुरुष समानतेला सर्व स्तरावर प्राधान्य देणे, स्त्री शक्तीचा सन्मान करणे, विशेषत: ओबीसी समाजात सामाजिक विषयांवर आदर्श आचारसंहिता घालून देणे, या उद्देशाला घेऊन सदर ओबीसी महिला अधिवेशन घेण्यात येत असल्याचे अधिवेशनाचे मुख्य संयोजक डॉ. अशोक जीवतोडे Dr Ashok jivatode यांनी सांगितले आहे.
या विदर्भ स्तरीय ओबीसी महिलांच्या अधिवेशनाच्या निमित्ताने प्रथमच एक ऐतिहासिक सामाजिक प्रयोग करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.