Saturday, January 24, 2026
HomeCrimeचंद्रपूर पोलीसांची गांजा विक्रेत्यावर कारवाई

चंद्रपूर पोलीसांची गांजा विक्रेत्यावर कारवाई

Chandrapur city police action against marijuana seller

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर पोलिसांनी गांजा विक्रेत्याच्या घरी धाड टाकत 93.05 ग्रॅम गांजा जप्त करीत एकूण 5,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शहरातील घूटकाळा परिसरातील बिनबा चौकात एक इसम अवैध गांजा विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती चंद्रपूर शहर पोलिसांना प्राप्त होताच पोलीस निरीक्षक यांचेसह पोलीस पथक पोहोचून धाड टाकत घराची झडती घेतली असता लिफाफासह 93.05 ग्रॅम गांजा आढळून आला सोबतच रोख 3900 रुपये, क्यूआर कोड स्टॅन्ड, कीपॅड मोबाईल व लोखंडी सुरा असा एकूण 5,500 रुपयांचा मुद्देमाल आढळला यावरून आरोपी शारिक जलील कुरेशी याचे विरुद्ध कलम 8 (C) 20 (B) IIA, सह 4,25 आर्म ऍक्ट सह 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. Chandrapur Crime

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जानबंधू उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सपोनि राहुल ठेंगणे, पोअपनि संदिप बच्छिरे, दत्तात्रय कोलते, पोहवा कपूरचंद खरवार, म.पोहवा भावना रामटेके, पोहवा इम्रान शेख, सचिन राठोड, इमरान खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांनी केली.
पुढील तपास पो.उप.नि. पल्लवी काकडे करीत आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular