Arriving of the Constituent Assembly at Babupeth, Chandrapur
चंद्रपूर :- भारतीय संविधानाला 75 वर्षपूर्ती निमित्ताने अमृत महोत्सवानिमित्त चालता फिरता संविधान मेळा चे आयोजन संविधान दिनापासून करण्यात आले, आज दिनांक 15 डिसेंबर रोजी बाबुपेठ परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर अर्धाकृती पुतळा येथे पोहोचला, येथे संविधान मेळा चे मोठ्या उत्साहात स्वागत करत संविधान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. चालता फिरता संविधान मेळा आज बाबुपेठ चंद्रपुरात
कही हम भूल न जाये या अभियाना अंतर्गत भारतीय संविधान आणि गणराज्याला 75 वर्ष पूर्तीचे अमृत महोत्सवा निमित्ताने डॉ बाबासाहेब यांनी लिहिलेल्या संविधान आणि चालविलेल्या चळवळीमुळे देशातील बहुजन समाजाला मानवाधिकार प्राप्त झालेत आणि ते हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून संविधानिकरित्या मुक्त झाले करिता संविधान अमृत महोत्सव अनुषंगाने संविधाना मध्ये निहीत असलेले हक्क व अधिकारांची माहिती देण्याकरिता तसेच संविधानाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याची जाणीव करून देण्यासाठी “चालता फिरता संविधान मेळा” चे आयोजन संविधान दिन 26 नोव्हेंबर 2024 पासून करण्यात आले. Indian Constituent Assembly
संविधान मेळा विदर्भातील 11 जिल्ह्यात जनजागृती करणार असून कार्यक्रमाची सांगता 26 जानेवारी 2025 रोजी 6 व्या बहुजन परिषद, भारतीय बौद्ध परिसर, शाखा भामटी, नागपूर येथे होणार आहे.
आज संविधान मेळा बाबुपेठ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा येथे पोहोचला,
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक एड अतुल पाटील, सर्वोच्च न्यायालयाचे लॉयर एड रितेश पाटील, इंजि बाळू रत्नपारखी, एड अश्विनी मुन यांचा सत्कार करण्यात आला.
इंजि संदीप कांबळे यांनी उपस्थितांना ‘चालता फिरता संविधान मेळा’ या उपक्रमाबाबत अवगत करत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
ऍड. अश्विनी मुन यांनी संविधान मेळा या उपक्रमाचा उद्देश आणि रूपरेषा याबाबत विस्तृत माहिती उपस्थितांना दिली.
बामसेफ चंद्रपूर जिल्हा युनिट चे इंजि बाळू रत्नपारखी यांनी संविधान मेळा दरम्यान संविधानाची महती जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि समारोपीय कार्यक्रमानिमित्त आयोजित सहाव्या बहुजन परिषदेशाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अविनाश वानखेडे यांनी केले.
‘चालता फिरता संविधान मेळा’ सोबत एकता मेश्राम, डॉ. बोधनकर, शालिनी कांबळे, माधवी बोरकर, भाग्यश्री तायडे आदी महिला वर्ग तसेच बाबुपेठ वार्डातील मनवर, साखरे, किशोर चिकाटे, विजय नगराळे, भोला दूधगवळी, गेडाम, राहुल राहुलगडे, अखिल निमगडे, आदी असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.