Monday, April 20, 2026
HomeCrimeअपहरण झालेल्या 3 वर्षीय बालकाची सुटका

अपहरण झालेल्या 3 वर्षीय बालकाची सुटका

Kidnapped 3-year-old boy rescued – Chandrapur police take bold action

चंद्रपूर :- बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरातून अप-व्यापाराच्या उद्देशाने अपहरण करण्यात आलेल्या अवघ्या ३ वर्षांच्या बालकाचा अवघ्या २० तासांत शोध लावून त्याला सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात चंद्रपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. Kidnapped 3-year-old boy rescued

दिनांक २८/०२/२०२६ रोजी २७ वर्षीय महिलेने पोलीस ठाणे बल्लारपूर येथे तक्रार नोंदविली. फिर्यादी महिला व तिचे पती हे बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरात वास्तव्यास असून कचरा गोळा करून उदरनिर्वाह करतात. दिनांक २७/०२/२०२६ रोजी रात्री कुटुंबासह स्टेशनसमोरील खुल्या पटांगणात झोपले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या ३ वर्षांच्या मुलाचे अपहरण केले.
याप्रकरणी गुन्हा क्र. ३२३/२०२६ कलम १३७(२) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. Chandrapur police take bold action

७ पथकांची स्थापना; १०० हून अधिक CCTV फुटेज तपासणी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चंद्रपूर पोलीस दलाने तातडीने हालचाल केली. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलीस ठाण्याची एकूण ७ पथके गठीत करण्यात आली.
१०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण व एका सजग नागरिकाच्या सतर्कतेमुळे आरोपींचा माग काढण्यात यश आले. तपासादरम्यान आरोपी मंचेरियल (तेलंगणा) येथे असल्याची माहिती मिळताच पथके तात्काळ रवाना करण्यात आली.

३.५० लाखांत विक्री; पाच महिला आरोपी अटकेत
तपासात उघड झाले की आरोपींनी रेल्वे स्टेशन परिसरात येऊन बालकावर पाळत ठेवली. आई-वडील झोपेत असताना मुलाचे अपहरण करून चारचाकी वाहनातून तेलंगणातील मंचेरियल येथे नेले व तेथे ३,५०,००० रुपयांत विक्री केली.
या प्रकरणी ऐलक्का रायसिंग बुद्दे (६०)
राणी विनोदकुमार पसनोटी (३०)
संगिता व्यंकटेश पानंगणती (४०)
सातक्का चंद्रया करेरे (५०)
लावण्या कुमारस्वामी कोणा (३४) या पाच महिला आरोपींना अटक करण्यात आली, याशिवाय दोन पुरुष आरोपींचा शोध सुरू आहे.

 बालक सुखरूप; पालकांच्या ताब्यात
आरोपींकडून अपहृत बालकाची सुखरूप सुटका करण्यात आली असून त्याला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर टोळीने इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याबाबत सखोल तपास सुरू आहे.

तेलंगणा पोलिसांचे मोलाचे सहकार्य
या कारवाईत तेलंगणा राज्यातील मंचेरियल पोलीस दलानेही चंद्रपूर पोलिसांना मोलाचे सहकार्य केले.

सदर कार्यवाही मुम्मका सुदर्शन पोलीस अधिक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, गौरव कार्यदेपाटील, परीविक्षाधिन सहा. पोलीस अधिक्षक चंद्रपूर, सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा उपविभाग चंद्रपूर, यांचे मार्गदर्शनात अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बिपीन इंगळे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे बल्लारपुर यांचे नेतुत्वात दिपक कांकेडवार सहायक पोलीस निरीक्षक, बलराम झाडोकार, सहायक पोलीस निरीक्षक, पोउपनि. अभिषेक जंगमवार, पोउपनि. विक्की लोखंडे पोउपनि. सुनिल गौरकार, सफौ. धनराज करकाडे, पोहवा. संतोष दांडेकर, पोहवा. मोहन निशाद, पोहवा. प्रविण निकोडे, पोहवा. किशोर वैरागडे, अजय बागेसर, इम्रान खान, दिपक डोंगरे, गजानन मडावी, हिरालाल गुप्ता, शेखर माथनकर, शंशाक बदामवार, किशोर वाकाटे, वैभव गाडगे, नरेंद्र वाकडे, महिला पो. अंमलदार अनिता नायडु, पोअं. रिषभ बारसिंगे, मिलौद टेकाम व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथील पो.अं. अनिमेश भोंगळे यांनी केली असुन तेलंगणा राज्य मंचेरियल पोलीस दलातील ए. भास्कर, पोलीस उपायुक्त, आर.प्रकाश, सहा. पोलीस उपायुक्त, एस. प्रमोद राव, पोलीस निरीक्षक, पोहवा. ई उपेंद्र, पोहवा. जे दशरथ, पोशी. एम लक्ष्मण, पोशी. आर थिरुपती, पोशी. महेश बेबी, पोशी. एम लक्ष्मण यांनी आरोपी ताब्यात घेण्यासाठी चंद्रपुर पोलीस पथकाला मोलाची केली आहे.

📢 “ऑपरेशन मुस्कान” अंतर्गत नागरिकांना आवाहन
चंद्रपूर पोलीस तर्फे जिल्ह्यात “ऑपरेशन मुस्कान” हा हरवलेल्या/पळविलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येणारा महत्वाचा उपक्रम सुरू आहे.
नागरिकांनी आपल्या परिसरात संशयास्पद हालचाल किंवा हरवलेल्या बालकांबाबत माहिती असल्यास डायल ११२ किंवा ७८८७८९०१०० या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular