Thursday, April 16, 2026
HomeCrimeघरफोडीचा गुन्हा काही तासांत उघड ; चोरी गेलेले दागिने तक्रारदारास परत

घरफोडीचा गुन्हा काही तासांत उघड ; चोरी गेलेले दागिने तक्रारदारास परत

House burglary case solved in a few hours in Chandrapur city

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील घुटकाळा वॉर्डातील भावसार चौक येथे घडलेल्या घरफोडीच्या घटनेचा तपास अवघ्या काही तासांत उलगडत, चंद्रपूर शहर पोलिसांनी आरोपीला अटक करून चोरी गेलेला सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर सदर दागिने तक्रारदार महिलेस परत करण्यात आले. Bulglary Crime

चंद्रपूर शहरातील घुटकाळा वार्डातील भावसार चौक येथे राहणारे विभा प्रशांत क्षिरसागर यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, त्यांच्या घरात अज्ञात इसमाने प्रवेश करून एकूण १,४७,४३२ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८५/२०२५ नोंद करण्यात आला असून, भारतीय दंड संहिता कलम ३०३(५), ३३१(३), ३१७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. Chandrapur City Police Station

या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली मपोहवा निता भगत व पोअं शिवाजी गोरे यांनी तातडीने तपास सुरू केला, काही वेळातच आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, चोरी गेलेला सर्व मुद्देमाल देखील आरोपीकडून जप्त करण्यात आला.

तपास पूर्ण झाल्यानंतर व फिर्यादीने न्यायालयातून सुपूर्दनाम्याची परवानगी घेतल्यानंतर एक सोन्याचे ‘ओम’ चिन्ह असलेले लॉकेट, दोन सोन्याचे गोप, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि एक मंगळसूत्र (काळ्या मण्यांसह) असा मुद्देमाल परत करण्यात आला.

या कारवाईमुळे तक्रारदार महिलेला मोठा दिलासा मिळाला असून, संपुर्ण सोन्याचे दागिने परत मिळाल्यामुळे त्यांनी चंद्रपूर पोलिसांचे आभार मानले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे विशेष मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात मपोहवा निता भगत व पोअं शिवाजी गोरे व शहर पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी केली.

.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular