Burglary case solved, criminal with record arrested
चंद्रपूर :- रामनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने रयतवारी कॉलरी परिसरात कारवाई करत रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मो. सरफोराज सागीर शहा उर्फ शुटर (वय २४) याला अटक केली आहे. त्याच्याकडून १,५४,००० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. Burglary Crime
रामनगर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून १३ जुलै २०२५ रोजी रात्री दरम्यान ही कारवाई करण्यात आली. चौकशीत आरोपीने दि. ७ जुलै ते ९ जुलै २०२५ या कालावधीत घरफोडी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ५२७/२०२५ कलम ३३१ (१), ३३१ (४), ३०५ भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ramnagar Police Station
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात सपोनि देवाजी नरोटे, हनुमान उगले, सपोनि निलेश वाघमारे, पो.अ. शरद कुडे, आनंद खरात, लालु यादव, पेतरस सिडाम, प्रशांत शेन्द्रे, जितेंद्र आकरे, बाबा नैताम, मनिषा मोरे, रविकुमार ढेंगळे, संदीप कामडी, पंकज ठोंबरे, प्रफुल्ल पुप्पलवार, सुरेश कोरेवार, ब्ल्युटी साखरे यांनी केली.