accused of Badlapur incident should be hanged immediately
बदलापूर येथील घटनेच्या आरोपींना तात्काळ फाशी द्या ..जिल्हा कार्याध्यक्ष तथा महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांची मागणी
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बदलापूर येथे 4 वर्षाच्या दोन मुलीवर लैंगिक अत्याचार घटनेच्या निषेधार्थ जिल्हा कार्याध्यक्ष तथा महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके शहर ,जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल, शहराध्यक्ष शिल्पा कांबळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. accused of Badlapur incident should be hanged immediately
,नको तुमची.. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्हाला पाहिजे सुरक्षा, बदलापूर घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, शिक्षण मंत्री, गृहमंत्री राजीनामा द्या अशा घोषणा देत राजकारणात गुंतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील बदलापूर या ठिकाणी चार वर्षेचा दोन अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी लैंगिक अत्याचार केला. ही घटना अतिशय दुर्दैवी असून संताप जनक आहे.
एकीकडे राज्य शासन महिला करिता लाडकी बहीण योजना राबवतात आणि दुसरीकडे मात्र त्याच बहिणीवर लहान मुलीवर महाराष्ट्रात अत्याचार होत आहे. गृहमंत्री खात मुंग गिळून गप्प का बसलंय. योजना आणली पैसे वाटले म्हणजे तुमचे कर्तव्य संपले का, मुख्यमंत्री राहतात त्या जिल्ह्यात मुली सुरक्षित नसतील राज्यातील इतर भागात तरी कशा सुरक्षित राहतील हा खरा प्रश्न आहे.
फक्त उद्घाटने सोहळे यामध्ये व्यस्त असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणीला न्याय देण्यासाठी मतांचे राजकारण करण्यापेक्षा गृहमंत्र्यांनी राज्यातील महिला सुरक्षिततेकडे लक्ष देऊन महिलांच्या संदर्भात कायदे कड्क करणे गरजेचे होते. परंतु असं या राज्यात होतांना दिसत नाही. अशी सडकून यावेळी करण्यात आली.
राज्याचे गृहमंत्री पूर्णपणे गृहमंत्री पद पद सांभाळण्यास अपयशी ठरलेले आहे. म्हणून राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडवणीस आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना त्यांच्या पदावर राहण्याचा मुळीच अधिकार नाही त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
बदलापूर घटनेतील प्रकरण जलद गती न्यायालयात प्रविष्ट करून लवकरात लवकर फासावर लटकवले पाहिजे अशा मागणी करता आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये उपस्थित ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकूर, जेष्ठ नेते डी के आरिकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुधाकर काकडे, माजी युवती जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष शरद मानकर, सेवा दलचे जिल्हा अध्यक्ष माणिक लोणकर, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष बाबुभाई, विद्यार्थी शहराध्यक्ष परब गिरडकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पूजाताई शेळके, जिल्हा उपाध्यक्ष वंदनाताई आवडे, चंद्रपूर तालुकाध्यक्ष अनिताताई माऊलीकर, मारुती झाडे, राहुल देवतळे, चेतन पाटील, बाबूलाल मेश्राम, शांताराम वैद्य, गौतम पाटील, प्रदीप मेश्राम, जिल्हा सचिव शोभाताई घरडे, नीलिमाताई आत्राम, छायाताई चौधरी, जिल्हा सचिव नीलिमा नरवडे, सुमित्रा वैद्य, सुशीला आलाम, शालिनी वैद्य, सिंधुताई मेश्राम, जलनगर वार्डातील महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.