Friday, March 21, 2025
HomeSocialस्व. कालीदास अहीर जयंती स्मृतीदिनी 251 रक्तदात्यांचे रक्तदान

स्व. कालीदास अहीर जयंती स्मृतीदिनी 251 रक्तदात्यांचे रक्तदान

Blood Donation by 251 Blood Donors on the Commemoration Day of Late Kalidas Ahir Jayanti

चंद्रपूर :- चंद्रपूरातील सामाजिक व कीडा क्षेत्रात उल्लेखनिय योगदान असलेले कमल स्पोर्टीग क्लब, चंद्रपूरचे संस्थापक स्व. कालीदास गं. अहीर यांच्या जन्मदिवस स्मृतीनिमित्त दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित रक्तदान शिबीरात 251 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक व राष्ट्रीय कार्यात योगदान दिले.

महानगरातील एस.पी. कॉलेज परिसरातील आय.एम.ए सभागृहात Kamal Sporting Club कमल स्पोर्टीग क्लबच्या वतीने आयोजित या रक्तदान शिबीराच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार संजय धोटे, हरिश्चंद्र अहीर, डॉ. अशोक जिवतोडे, विजय राऊत, खुशाल बोंडे, अनिल फुलझेले, राजेश मुन, तारेंद्र बोर्डे, किशोर बावने, डॉ. राजु सैनानी, डॉ. रजनीकांत भलमे, दामोदर मंत्री, मधुसूधन, रूंगटा, दिनदयाल कावळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, करण देवतळे, मथुराप्रसाद पांडे व अहीर परिवारातील सदस्य यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी स्व. कालीदास अहीर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. आपल्या प्रास्ताविकातून हंसराज अहीर यांनी सांगीतले की माझे बंधू कालीदास अहीर यांचे सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य होते. त्यांच्या कार्याची स्मृती सदैव तेवत राहावी म्हणून मागील 19 वर्षांपासून रक्तदान शिबीराचे आयोजन करून अहीर कुटूंबिय त्यांच्या कार्यास उजाळा देत असल्याची भावना व्यक्त केली.

आ. किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी जिल्ह्याच्या रक्तदान चळवळीमध्ये हंसराज भैय्या यांचे मोलाचे कार्य असून चंद्रपूरात त्यांच्याच प्रेरणेतून रक्तदान चळवळ गतीशील झाली असल्याचे सांगुन हे कार्य सातत्य ठेवून करीत असल्याने त्यांच्या या कार्यातून राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. यावेळी डॉ. अशोक जिवतोडे व खुशाल बोंडे यांनीही समयोचित विचार व्यक्त केले.

या रक्तदान शिबीरात चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा, कोरपना, वणी व अन्य तालुक्यातील रक्तदात्यांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले. यावेळी अतिथींना स्मृतीचिन्ह व रक्तदात्यांचा भेटवस्तु व प्रमाणपत्र देवून हंसराज अहीर व मान्यवरांनी सन्मान केला.

या रक्तदान शिबीरात लाईफलाईन रक्तपेढी, नागपूर व जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्त संक्रमण विभागाच्या वैद्यकीय अधिकारी व चमुंनी विशेष परिश्रम घेत योगदान दिले. त्यांनाही हंसराज अहीर यांनी भेटवस्तु देवून सन्मानित केले.

या रक्तदान शिबीराला राजेंद्र अडपेवार, संदिप आवारी, राजू घरोटे, विनोद शेरकी, प्रविण सातपुते, विजय वानखेडे, नारायण हिवरकर, अफजलभाई, श्रीनिवास सुंचूवार, अंकुश आगलावे, राजू येले, शाम कनकम, राजू कामपेल्ली, रामा भंडारी, डॉ. भूपेश भलमे, श्रीकांत भोयर, विकास खटी, संजय खनके, पुनम तिवारी, गौतम यादव, सुदामा यादव, सुभाश गौरकार, सुनिल उरकुडे, बाळु कोलनकर, अतुल रायकुंडलीया, स्वप्नील मुन, राजेश वाकोडे, प्रदिप किरमे, संतोष वडपल्लीवार, सुभाष आदमने, राजू कागदेलवार, रवी नागापूरे, गणेश गेडाम, प्रमोद शास्त्रकार, राजू गायकवाड, विठ्ठल डुकरे, गंगाधर कुंटावार, बाळू कोतपल्लीवार, धनंजय पिंपळशेंडे, जगदिश दंडेले, राहुल सुर्यवंशी, बलाई चक्रवर्ती, दिनकर सोमलकर, हंसराज रायपूरे, वंदना संतोषवार, घोडेस्वारताई, अर्जुन तिवारी, संजय मिसलवार, संदिप देशपांडे, मयुर भोकरे, प्रनय डंबारे, चेतन शर्मा, प्रविण चुनारकर, गोविंदा बिंजवे, शाम बोबडे, देवेंद्र मालुसरे, निलेश ताजने, किशोर गोवारदीपे, प्रदिप महाकुलकर, प्रलय सरकार यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राहुल बनकर यांनी केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular