Work with the spirit of ‘one goal, one thought’
Minister Sudhir Mungantiwar’s appeal to Party workers
Ballarpur City and Rural BJP Conference
यावेळी भाजपा जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,लखनसिंह चंदेल,काशी सिंह, मनीष पांडे, निलेश खरबडे, समीर केणे, रणंजय सिंग, शिवचंद द्विवेदी, रेणुका दुधे, वैशाली जोशी, आशीष देवतळे, राजू दारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘संगठन गढ़े चलो, सुपंथ पर बढ़े चलो, भला हो जिसमें देश का, वो काम सब किए चलो’ या ब्रीदनुसार कामं करायचे आहे. खुर्ची प्राप्त करणे हे आपले ध्येय नाही. भाजपाचा कार्यकर्ता सत्तेसाठी नव्हे देशाच्या विकासासाठी काम करतो. तीच भावना कायम ठेवून येत्या काळात ‘बी फॉर भारत’, ‘बी फॉर बल्लारपूर’, ‘बी फॉर बीजेपी’ याच तत्त्वाने काम करा.’ ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, शेतकऱ्यांना मोफत वीज अशा अनेक योजनांतून महाराष्ट्रातील महायुती सरकारने राज्यातील महिला, युवा आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. देशात सर्वाधिक पीक विमा चंद्रपूर जिल्ह्यात झाल्याचे देखील त्यांनी सांगितले.
संविधानाचा खोटा प्रचार आणि अनुसूचित जाती-जमातीच्या बांधवांची काँग्रेसने केलेली दिशाभूल ही देखील लोकसभेतील पराभवाची कारणे आहेत. भाजपा दलितविरोधी असल्याचा अपप्रचार काँग्रेसने केला. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्वत: काँग्रेसचा विरोध करायचे. ‘काँग्रेस हे जळते घर आहे. जो यात जाईल तो भस्म होईल,’ असे ते म्हणायचे. त्याच बाबासाहेबांचे नाव वापरून काँग्रेसने खोटा प्रचार केला आणि समाजाची दिशाभूल केली. खरे वास्तव पुढे आणण्यासाठी जनतेत जाऊन त्यांना वास्तवाची जाणीव करून देण्याची गरज आहे. आज काँग्रेस जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. अशात आपले नाव आग लावणाऱ्यांत नाही तर आग विझविणाऱ्यांत घेतले जावे, याच हेतून आणि पवित्र उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून काम करण्याचे आवाहन देखील ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना केले. सोशल मीडिया हे आजच्या युगातील मोठे अस्त्र,शस्त्र आहे. त्याचा उपयोग योग्यप्रकारे करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाने ‘हर घर तिरंगा’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाचे योग्य नियोजन करावे. आणि जास्तीत जास्त नागरिकांना अभियानात सामील करून घ्या, असे आवाहन ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.