Saturday, January 17, 2026
HomeMPपूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते राजुरा येथे भाजपा सदस्यता...

पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते राजुरा येथे भाजपा सदस्यता अभियानाचा शुभारंभ

BJP membership drive launched in Rajura under the auspices of former Union Minister of State for Home Hansraj Ahir

चंद्रपूर :- संगठन पर्व मोहिमेच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय सदस्यता अभियान 2025 चा शुभारंभ राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir यांचे शुभहस्ते राजुरा येथील अॅड. यादवराव धोटे महाविद्यालयाच्या प्रागणांत पार पडला. BJP membership drive launched in Rajura

दि. 6 जानेवारी 2025 रोजी हंसराज अहीर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या सदस्यता अभियानास माजी आमदार सदर्शन निमकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्षद्वय अरूण मस्की, सतिश धोटे, भाजयुमो जिल्हा महामंत्री राहुल सुर्यवंशी, कामगार आघाडी उपाध्यक्ष महादेव तपासे, भाजयुमोचे माजी तालुकाध्यक्ष सचिन शेंडे, भाजयुमो सास्ती अध्यक्ष अरूण लोहबळे, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष भुषण जुनघरी यांचेसह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या सदस्यता अभियान प्रसंगी हंसराज अहीर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुक्याला दिलेले सदस्य नोंदणी अभियानाचे उद्दिष्ट साध्य करून पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्नातून या अभियानाला यशस्वी करण्याचे आवाहन केले.

आगामी जि.प., पं.स. व नगरपालिका व अन्य निवडणूका दृष्टीपथात ठेवून पक्षाचे संघटन मजबुतीने उभे करावे असेही त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले.

या अभियानामध्ये शेकडो नागरिकांनी स्वयंस्फुर्तनि सहभागी होवून भाजपाचे सदस्यत्व स्विकारले. या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular