Saturday, January 24, 2026
HomeEducationalकारागृह पोलिस भरतीत भुवन डेरकर नागपूर विभागातून अव्वल

कारागृह पोलिस भरतीत भुवन डेरकर नागपूर विभागातून अव्वल

Bhuvan Derkar tops in Prison Police Recruitment from Nagpur Division

चंद्रपूर :- बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील किराणा दुकान व्यवसायिक रमेश डेरकर यांचा मुलगा भुवन डेरकर याने कारागृह पोलिस भरतीत नागपूर विभागातून अव्वल येऊन बल्लारपूर तालुक्याचे नाव उंचावले आहे.

त्याच्या या यशाची माहिती मिळताच गावातील त्याच्या मित्रांनी व गावकऱ्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. फटाक्यांच्या आतीषबाजीसह त्याच्यावर गुलाल उधळून आनंद साजरा करण्यात आला. Bhuvan Derkar tops in Prison Police Recruitment

बल्लारपूर शहरातील स्टडीट्रॅक अकॅडमी मध्ये रोहित जंगमवार सर यांच्या मार्गदर्शनात भुवन ने पोलिस भरतीची तयारी केली होती. या अभूतपूर्व यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

भुवन ने त्याच्या या यशाचे श्रेय आईवडील तसेच स्पर्धा परिक्षा शिक्षक रोहित जंगमवार यांना दिले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular