At the initiative of Guardian Minister Sudhir Mungantiwar, an attractive station for auto drivers of Chandrapur
चंद्रपूर :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या ऑटोरिक्षाचालकांसाठी अत्यंत आकर्षक असा Auto stand ऑटोस्टँड (स्थानक) साकारला आहे. या स्थानकाचे लोकार्पण मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीने पुढाकार घेऊन ऑटोरिक्षाचालकांसाठी अशाप्रकारची सोय करून देणे, ही दुर्मिळ बाब असल्याची भावना ऑटोरिक्षाचालकांमधून व्यक्त होत आहे.
‘नवरात्रीच्या शुभपर्वावर शहरातील ऑटो रिक्षाचालकांच्या चेहऱ्यावर आनंद बघताना आंतरिक समाधान लाभत आहे. अत्यंत कष्टाने आयुष्य जगणाऱ्या या ऑटोचालक बांधवांसाठी, त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मला काही करता आले याचा अभिमान आहे,’ असे भावनिक प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार Minister Sudhir Mungantiwar यांनी केले.
चंद्रपूर बस स्थानकाशेजारी अतिशय उत्तम दर्जाचे ऑटोस्टॅंड महानगरपालिकेच्या माध्यमातून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी करून घेतले. लोकार्पण सोहळ्याला जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, प्रकाश धारणे,अनिल डोंगरे, नामदेव डाहुले, राजेंद्र खांडेकर, मधुकर राऊत, विनोद चन्ने, सुनील धंदरे यांच्यासह ऑटो रिक्षा युनियनचे पदाधिकारी व ऑटो रिक्षाचालक उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘ऑटो रिक्षाचालक हा समाजाचा प्रमुख घटक आहे. त्यांना सन्मानाने व समाधानाने जीवन जगता यावे यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मला जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करीत आलो आहे. ऑटो रिक्षा चालकांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य लाभावे ही माझी मनोमन इच्छा आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना व्यवस्थित घर मिळावे याचाही मी पाठपुरावा करीत आहे.’
कल्याणकारी मंडळाची स्थापना
‘महाराष्ट्रातील लाखो ऑटो रिक्षा, मिटर्ड टॅक्सी चालकांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्यासाठी महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला; विशेष म्हणजे 9 मार्च 2018 च्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री असताना मी हा विषय प्रामुख्याने मांडला होता. ऑटो आणि टॅक्सी चालकांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळावा, कौटुंबिक सुरक्षा लाभावी या दृष्टीने पावले उचलण्याची सूचना केली होती,’ असेही श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले.
ऑटोचालकांनी मानले पालकमंत्री मुनगंटीवार यांचे आभार
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराला मिळालेले हे यश आणि आमच्या कल्याणासाठी त्यांच्याकडून होणारे प्रयत्न आम्ही कधीच विसरणार नाही अश्या भावना यावेळी ऑटो रिक्षाचालकांनी व्यक्त केल्या. ऑटो रिक्षा चालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आतिषबाजी करून व पुष्पहारासह श्री मुनगंटीवार यांचे स्वागत केले व आभार मानले.
उत्तम दर्जाच्या व्यवस्था करा
सन 2018-19 मध्ये ऑटो रिक्षा कल्याणकारी महामंडळ स्थापनेच्या दृष्टीने पाच कोटी रुपये इतका नियतव्यय राखून ठेवण्यात येत असल्याचेही श्री.मुनगंटीवार यांनी त्यावेळी घोषित केले होते. ऑटो रिक्षा चालक, मीटर टॅक्सी चालक यांच्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांची भावना अत्यंत संवेदनशीलतेची असून चंद्रपूर येथील या अद्ययावत ऑटो रिक्षा स्टॅन्ड मध्ये उत्तम दर्जाच्या व्यवस्था असाव्या याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी उद्घाटनप्रसंगी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. या ऑटोरिक्षा स्टँड मुळे शहरातील प्रवाशांची सुद्धा चांगली सोय होणार आहे.