Hansraj Ahir honored by Chandrapur District Gawli Samaj for approval of Shri Krishna Economic Development Corporation
चंद्रपूर :- महाराष्ट्र गवळी समाज संघटना रजि .नं. ५४९ च्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून गवळी समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व रोजगारभिमुख उत्थानाकरिता श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून या समाजाला न्याय देण्याची मागणी करण्यात येत होती. समाजाचे मार्गदर्शक नेतृत्व, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे विद्यमान अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या सक्षम नेतृत्व व पुढाकाराने सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या महायुती सरकारने नुकतेच गवळी समाज बांधवांकरीता श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केल्याने चंद्रपूर जिल्हा गवळी समाज संघटनेच्या पदाधिकारी व समाजबांधवांनी समाजाचे भुषण हंसराज अहीर Hansraj Ahir यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. Shri Krishna Economic Development Corporation
दि. १२ ऑक्टोंबर २०२४ रोजी हंसराज अहीर यांच्या कार्यालयात जावून समाज बांधवांनी त्यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव करून त्याचे आभार मानले गवळी समाजाच्या न्यायोचित मागण्याबाबत हंसराज अहीर यांनी वेळोवेळी शासनस्तरावर पाठपुरावा करीत अनेक महत्वपूर्ण मागण्याची पूर्तता करवून घेण्यात मोठे योगदान दिल्याने त्यांच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा प्राप्त झाल्याचे अनेक समाज बांधवांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. अहीर यांनी या सन्मानासाठी संघटनेचे राज्यस्तरीय पदाधिकारी व अनेक समाजबांधवांचे अविश्रांत परिश्रम कारणीभूत ठरल्याचे सांगत गवळी समाजाच्या न्याय मागण्यांप्रती आपण सदैव प्रयत्नशील राहू असे त्यांना भेटलेल्या शिष्टमंडळास आश्वासन दिले. Hansraj Ahir honored by Chandrapur District Gawli Samaj
याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष गौतम यादव, किसनलाल कालीवाले, दयानंद बंकुवाले, प्रकाश चांभारे, बबन बाखरवाले, अरविंद चौधरी, गुलाब यादव, जगदीश दंडेले, घनश्याम यादव, माताबादल यादव, सुरेश दंडेले, विलास देशवाले, नरेंद्र अकोलेवाले, सुरेश यादव, कमल कजलीवाले, श्याम काटेवाले, शामकांत यादव, शिवम देशवाले, सुभेदार यादव, शिवम देशवाले, अजय यादव, अनिकेत दंडेले, विक्रम बाखरवाले, सनी कोल्हापूरे, मंथन नंदवंशी, अखिलेश चौधरी यांचेसह अन्य समाजबांधव उपस्थित होते.