Rajura Liberation Struggle Day celebrated with enthusiasm at Rajura
चंद्रपूर :- मराठवाडा मुक्ती संग्राम तथा राजुरा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून सकाळी ठिक ९ वाजता तहसील कार्यालय राजुरा च्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. Marathwada Liberation Struggle and Rajura Liberation Struggle Day
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. रवींद्र माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस विभागाने पथ संचालन केले, शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांसह उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत गाऊन तसेच राजुरा मुक्ती संग्राम दिन चिरायऊ होवो अशा घोषणा देत राजुरा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा केला.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अँड. वामनराव चटप, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगराध्यक्ष रमेश नगराळे, तहसीलदार ओमप्रकाश गौड, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कृषी अधिकारी विठ्ठल मकपलले, चेतन चव्हाण, पत्रकार डॉ. उमाकांत धोटे, अनिल बाळसराफ, गणेश बेले, प्रा. प्रफुल्ल शेंडे, उमेश मारसेट्टीवार यासह राजुरा शहरातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालयांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. मोहन मेश्राम यांनी केले.