Saturday, January 17, 2026
HomeEducationalउत्तुंग ध्येय ठेवा, परिश्रम करा, यश मिळेल - आ. सुधाकर अडबाले

उत्तुंग ध्येय ठेवा, परिश्रम करा, यश मिळेल – आ. सुधाकर अडबाले

Aim high, work hard, success will come Assertion of MLA Sudhakar Adbale

चंद्रपूर :- विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येय ठेवावे आणि त्यासाठी परीश्रम करण्याची तयारी ठेवावी. आयुष्यात आपले ध्येय गाठायचे असेल तर परिस्थितीला घाबरू नका त्यावर मात करा .प्रचंड मेहनत करा, स्वतःवर विश्वास ठेवा, आयुष्यात यशस्वी व्हाल असे प्रतिपादन आमदार सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale यांनी उद्घाटन प्रसंगी केले. Aim high, work hard, success will come

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा संचालित श्री शिवाजी महाविद्यालय व सोनिया गांधी पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उद्घाटन आमदार अडबाले यांच्या हस्ते पार पडले यावेळी ते बोलत होते. शैक्षणिक संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे असे प्रतिपादन आमदार अडबाले यांनी केले. Reunion ceremony at Shivaji College Rajura

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार सुदर्शन निमकर होते. प्रमुख उपस्थितीत आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, कोषाध्यक्ष साजिद बियाबाणी, संचालक प्राचार्य दौलतराव भोंगळे, दौलतराव भोंगळे, केशव ठाकरे, प्राचार्य डॉ. संभाजी वारकड, उपप्राचार्य डॉक्टर खेरानी, मुख्याध्यापक नानाजी डाखरे, रामेश्वर डोरलीकर, मुख्याध्यापक भोयर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आनंद चलाख, जिल्हा कार्यवाह दीपक धोपटे, राजू डाहुले, सुभाष शेंडे, सोनिया गांधीच्या प्राचार्या कृतिका सोनटक्के यांची उपस्थिती होती.

यावेळी संस्थेच्या वतीने व शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह सत्कार करण्यात आला. तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष आनंद चलाख व कार्यवाह दीपक धोपटे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयीन स्तरांवर घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांचा सत्कार यावेळेस आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव यांनी शैक्षणिक संस्था समोरील समस्या दूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली. कित्येक वर्षापासून कृषक जमिनीवर शाळांचे इमारती आहेत व यात हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन आपले भवितव्य घडविले आहे.मात्र शासनाने या जमिनीवर कर लावून शाळांना लाखो रुपये भरण्यासाठी तगादा लावलेला आहे. याबाबत शासनाने शैक्षणिक संस्थांना वगळावे अशी मागणी या प्रसंगी केली तसेच कोळसा खानी असलेल्या क्षेत्रामधील शाळांमध्ये ब्लास्टिंग मुळे इमारतींना तडे गेलेले आहेत. अनेक वर्ग खोल्या बसण्यासाठी धोकादायक आहेत. अशा क्षेत्रात सी एस आर निधी अंतर्गत वेकोलीने वर्ग खोल्या बांधून द्याव्यात अशी मागणी याप्रसंगी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संभाजी वारकड यांनी केले व महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा प्रस्ताविक भाषणातून घेतला. संचालन प्रा. बी. यू बोर्डेवार तर आभार प्रा. लाटेलवार यांनी केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular