case has been filed against two people who consume narcotic drugs
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात अंमली पदार्थाची विक्री तसेच सेवन करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाची कारवाई दरम्यान LCB स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिलम मध्ये गांजा भरन सेवन करणाऱ्या दोघांवर एनडीपीएस ऍक्ट नुसार गुन्हे दाखल केले आहे. case has been filed against the narcotics drug addicts
अंमली पदार्थांच्या सेवनाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून यातून घरफोडी, वाहन चोरी तसेच छोट्या भांडणातून हत्या करणेपर्यंत गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे उदाहरणं घडत आहेत. यामुळे अंमली पदार्थांच्या विक्री व सेवन करण्यावर निर्बंध तसेच नियंत्रण करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरु केली यादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली कि, बाबुपेठ गार्डन व कामगार चौक परिसरात चिलममध्ये गांजा भरून काही युवक सेवन करीत आहेत यावरून पथकाने दोन्ही युवकांविरुद्ध कलम 27 एनडीपीएस ऍक्ट नुसार विविध तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमम्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जगबंधु यांचे मार्गदर्शनाखाली महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुम्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि मधुकर सामलवार, पोहवा सुरेंद्र महतो, सतिश अवथरे, संतोष बेलपुलवार, गोपाल आतकुलमार, नितीन रायपुरे, गोपीनाथ नराते, प्रमोद कोटनाके, मिलींद टेकाम यांनी केली.
अंमली पदार्थ खरेदी – विक्री, सेवन बाबत काहीही माहिती असल्यास, तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर येतो ११२ या टोल – फ्री क्रमांकावर माहिती देवुन चंद्रपूर नशा मुक्त करण्यात नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



