Saturday, January 18, 2025
HomeAssembly Electionइंडिया आघाडीच्या प्रमुख युवा पदाधीकाऱ्यांची बैठक संपन्न

इंडिया आघाडीच्या प्रमुख युवा पदाधीकाऱ्यांची बैठक संपन्न

meeting of key youth office bearers of India Aghadi concluded in the backdrop of the upcoming assembly elections

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील संतकृपा हॉटेल येथे दिनांक 25 ऑक्टोबर रोजी इंडिया आघाडी तर्फे युवा आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध पक्षांच्या युवा पदाधिकाऱ्यांचा समावेश होता, यात विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात विचारांची देवाणघेवाण केली.

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाली सुरु झाल्यामुळे युवा आघाडीच्या सदस्यांना संधी मिळने अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकसभा निवडणुकीत युवा आघाडीला योग्य स्थान न मिळाल्यामुळे उपस्थित युवा कार्यकर्त्यांनी आपल्या नाराजीचे दर्शन घडवले. त्यांनी स्पष्ट केले की, या चुकांना पुन्हा पुनरावृत्त न करण्यासाठी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी सक्रिय भूमिका घेणे आवश्यक आहे.

यावेळी सर्व उपस्थितांनी एकमताने ठराव पारित केला, ज्यात इंडिया आघाडीच्या नेतृत्वाने युवा कार्यकर्त्यांच्या चिंता आणि अपेक्षा याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. युवा प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी या बैठकीत विचारलेल्या मुद्द्यांवर चर्चा केली.

युवानी पुढे येऊन राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले, तसेच आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्या स्थानासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. बैठक यशस्वी ठरली आणि युवा आघाडीच्या भविष्याबद्दल आशा आणि उत्साह व्यक्त करण्यात आला. मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त युवाना कसे आणता येईल व इंडिया आघाडीला कसे मतदान मिळवून देण्यात येईल याचा रोडमॅप बनविण्यात आला .

या बैठकीच्या निर्णयांमुळे युवा कार्यकर्त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव होईल आणि त्यांचा राजकीय आवाज अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली व लवकरच युवकांची मोठी बैठक घेण्यात येईल
असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे राजू कुडे युवा जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांनी कळविले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular