Congress protests against Modi government in Chandrapur
चंद्रपूर :- काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या खा. श्रीमती सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी व काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांविरुद्ध सत्तेचा दुरुपयोग करून केंद्रातील मोदी सरकार आकसपुर्ण कारवाई करीत आहेत. Chandrapur Congress protests against Modi government in Chandrapur
मोदी सरकारचा हा निर्णय लोकशाही परंपरेला घातक आहे. लोकसभेत प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्यांवर सुडबुद्धीने कार्यवाही करुन जनसामान्यांचा आवाज दडपण्याचा हा डाव आहे. त्या विरोधात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आदेशावरून चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी निदर्शने करून विरोध नोंदविण्यात आला. Protest against arbitrary action against Congress leaders
यावेळी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांना निवेदन देण्यात आले व चंद्रपूर जिल्हातील जनसामान्या नागरिक व कार्यकर्ते यांची न्याय्य मागणी लक्षात घेऊन सदर नेत्यांवरील आकसपुर्ण कार्यवाही थांबविण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. या आंदोलनात ग्रामीण युवक काँग्रेस ने निषेद व्यक्त करत मोदी सरकार विरोधात फलक दाखविण्यात आले.

