Friday, April 17, 2026
HomeEducationalइन्फंट च्या विद्यार्थ्यांचा विभागीय पातळीवर दैदिप्यमान विजय

इन्फंट च्या विद्यार्थ्यांचा विभागीय पातळीवर दैदिप्यमान विजय

Infant students win brilliantly at the divisional level

चंद्रपूर :- जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे पार पडलेल्या “Jump Rope” या विभागीय स्तरावरील स्पर्धेत इन्फंट जीसस इंग्लिश हायस्कूल, राजुरा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकाविला.

यात इयत्ता १० चे आयुष थोरात, क्रिष्णा मोहितकर, इशांत लढी, अवधूत पिंगे, आदित्य गंधवेवई, इयत्ता ९ वी चा विशु सिंग या विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले आहे. Selected for the state-level jump rope competition

विद्यार्थ्यांच्या या दैदीप्यमान विजयाच्या जोरावर शाळेतील विद्यार्थ्यांची निवड आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. खेळाडूंच्या मेहनतीला, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाला आणि शाळेच्या पाठबळाला मिळालेलं हे यश संपर्ण राजुरा शहरासाठी गौरवाची बाब आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, संस्थेचे सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षिरसागर, शुभम बनैवार यासह शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग आणि विद्यार्थीनी अभिनंदन केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular