Friday, April 17, 2026
HomeMaharashtraसर्वोदय विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचा संकल्प

सर्वोदय विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचा संकल्प

Resolve to bring Sarvodaya thought to every corner of the country

चंद्रपूर :- राजीव गांधी पंचायती राज संघटन व चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने धनोजी कुणबी सभागृह राजुरा येथे दिनांक 23 व 24 मार्च 2025 रोजी सर्वोदय संकल्प शिबीराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराच्या पहिल्या दिवशी राष्ट्र निर्माण, राष्ट्र निर्माणात संविधानाची भुमिका, आपले योगदान, राजकारण आणि काँग्रेस, सामुहिक चर्चा, प्रार्थना तर आज दिनांक 24 मार्च ला शिबिराच्या दुसर्‍या दिवशी आदर्श गाव कळमना येथे श्रमदान, त्यानंतर शिबीरस्थळी अनुभव कथन, भारत संघर्ष, समतेसाठी संघर्ष व सभाग, पंचायतराज ची आवश्यकता, गटचर्चेतून भविष्यासाठी योजना, असे उपक्रम घेऊन भारताचे संविधान व देशावरील संकटे आणि ती दुर करून पून्हा एकदा भयमुक्त, सशक्त भारतासाठी संघर्ष यावर सविस्तर विचार मंथन करण्यात आले. तसेच स्थानिक परिसरात सर्वोदय विचारांचा प्रसार व कृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचा संकल्प घेण्यात आला. राष्ट्रगीताने शिबिराचा समारोप करण्यात आला. Conclusion of Sarvodaya Sankalp Camp

समारोपीय कार्यक्रमाला राजीव गांधी पंचायती राज संघटनेचे राष्ट्रीय महासचिव दिपकभाई राठोड, महाराष्ट्र प्रभारी नारायण सिंग राठोड, राष्ट्रीय महासचिव संजय समर्थ, राष्ट्रीय सचिव गीता कडवे, प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे, उपाध्यक्ष मनोज भोयर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुनंदाताई धोबे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, प्रदेश महासचिव नंदकिशोर वाढई, जिल्हाध्यक्ष बंडूजी धोतरे, जिल्हाध्यक्ष रवी खापरे (एम. पी), आदर्श सरपंच चंदूपाटील मारकवार, राजु रेड्डी, शहराध्यक्ष जयंत घोडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवार, तालुकाध्यक्ष विजय गावंडे, रमाकांत लोधे, प्रमोद चौधरी, मिलिंद भोयर, खेमराज तिडके, गोविंदा उपरे, अनिल नरुले, प्रभाकर येरणे, इर्शाद शेख, निर्मला कुडमेथे, सोनू दिवसे, संध्या चांदेकर, कुसुमताई आलाम, सुरेखा शेंबेकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular