Friday, April 17, 2026
HomeCrimeकत्तलीसाठी जाणाऱ्या ६ वाहनातील ७२ जनावरांची सुटका

कत्तलीसाठी जाणाऱ्या ६ वाहनातील ७२ जनावरांची सुटका

72 animals rescued from 6 vehicles bound for slaughter

चंद्रपूर :- घूग्घूस मार्गे तेलंगणा येथे अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या तब्बल ६ ट्रक चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB पथकाने घूग्घूस रोड वरील धानोरा टोल नाका परिसरात सापळा रचून नाकाबंदी करीत जप्त केले असून यातील ७२ गोवंशाची सुटका केली, यात ६ ट्रक, ७२ गोवंश असा एकूण १,७०,७०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 6 trucks seized for cattle smuggling

दिनांक २१ जून २०२५ रोजी काही ट्रक मध्ये जनावरे (गोवंश) बाधुन वाहनाच्या डाल्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात गाई बैल (गोवंश) भरून त्यांची कत्तलीसाठी घुग्घुस मार्ग पडोली, चंद्रपुर असे तेलगंना अवैधरित्या वाहतुक करीत आहे अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली, प्राप्त माहितीवरून LCB स्थानिक गुन्हे शाखेने धानोरा टोल नाका, घुग्घुस रोड येथे नाकाबंदी करून ६ आयचर ट्रकची पाहणी केली असता, वेगवेगळया ट्रक मध्ये जनावरे (गोवंश) क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात गाई – बैल (गोवंश) भरून त्यांची कत्तली करीता वाहतुक करतांना आढळून आले. Chandrapur Crime

सदर वाहनाचे चालक, क्लिनर यांना वाहतुक करीत असलेल्या जनावराबाबत कागदपत्रे मागितले असता त्यांनी भंडारा, गोदिया येथुन जनावरे खरेदी केल्याचे पावत्या सादर केल्या. त्यावरून सदर पावत्या संबंधाने पडताळणी केली असता जनावरे वाहतुक करीत असलेल्या पावत्यावर सरकारी अधिकारी यांची बनावट सही करुन त्याव्दारे सदर वाहतुक ही कायदेशिर असल्याचे दाखवुन अवैधरित्या प्राण्यांची क्रूरपणे वाहतुक करत आढळून आले. Cattle Smuggling

दरम्यान ट्रक चालकांकडुन ६ ट्रक, जनावरे वाहतुक करण्यासाठी वापरलेली पायलटींग वाहन व एकुण ७२ गोवंश असा एकुण १,७०,७०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकुण १८ आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन, घुग्घुस येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

अवैधरित्या कत्तली करीता वाहतुक करीत असलेले जनावरे हे सुरक्षेच्या दृष्टीने प्यार फाउंडेशन, छोटा नागपुर, जि. चंद्रपुर यांचेकडे जमा करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि. बलराम झाडोकार, पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. संतोष निंभोरकार, पोउपिन सुनिल गौरकार, सफौ धनराज करकाडे, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्‌ठावार, जयसिंग, गणेश मोहुर्ले, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, दिनेश अराडे, रूषभ बारसिंगे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर तसेच पोलीस स्टेशन, घुग्घुस येथील सपोनि तायवाडे असे अधिकारी व कर्मचारी तसेच पशुधन विकास अधिकारी घुग्घुस यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular