Friday, April 17, 2026
HomeCrimeभद्रावतीत १ किलो ४८० ग्रॅम गांजा सह युवकाला अटक

भद्रावतीत १ किलो ४८० ग्रॅम गांजा सह युवकाला अटक

Youth arrested with 1 kg 480 grams of ganja in Bhadravati

चंद्रपूर :- भद्रावती शहरात गांजा बाळगणाऱ्या आरोपीला भद्रावती पोलिसांनी अटक करीत त्याचे जवळील १ किलो ४८० ग्रॅम गांजा सह एकूण ८९१८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरूद्ध एन डी पी एस (NDPS) कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Youth arrested with 1 kg 480 grams of ganja in Bhadravati

भद्रावती पोलिसांचे गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करीत असताना एक इसम दुचाकीने पाठीवर बॅग घेऊन त्यात गांजा बाळगून असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच गुन्हे शोध पथक आयुध निर्माणी चांदा गेट क्रमांक ३, सुमठाणा चौक, भद्रावती या घटनास्थळी पोहचत संशयिताला ताब्यात घेत त्याच्या बॅग ची झडती घेतली असता बॅग मध्ये गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला त्यात १ किलो ४८० ग्रॅम गांजा आढळून आला यावरून गांजा व हिरो स्प्लेंडर दुचाकी असा एकूण ८९१८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी क्षितिज जुनघरे (१९), रा. भंगाराम वॉर्ड भद्रावती याला एनडीपीएस कायद्या अन्वये अटक करण्यात आली आहे. Bhadrawati Police Station

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता वाढीवे, गुन्हे शोध पथकाचे सपोनि मोहन धोंगळे, पोउपनि गजानन तुपकर, सफौ महेंद्र बेसरकर, पोहवा अनुप आस्तूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, खुशाल कावळे, योगेश घाटोळे आदी पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular