back in the fray for the people: MLA Subhash Dhote
चंद्रपूर :- राजुरा विधानसभा मतदारसंघांतून आपण मला दोनदा विधानसभेत पाठवले. आपण दिलेल्या संधीचे सोने करण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न केला. अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत. आता येणाऱ्या काळात क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी व जनसामान्यांच्या विकासासाठी मी पुन्हा मैदानात असून मायबाप जनतेने मला पुन्हा संधी द्यावी असे विनंती वजा आवाहन आमदार सुभाष धोटे MLA Subhash Dhote यांनी मतदारांना केले आहे.
आमदार सुभाष धोटे यांनी सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीने यावेळी तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजयाच्या निर्धारासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सकाळी ठिक १२ : ३० वाजता राजुराचे आराध्य दैवत भवानी माता मंदिर येथे दर्शन व आशिर्वाद घेऊन आ. सुभाष धोटे यांनी आपल्या विजय संकल्प महा मिरवणूकीला सुरूवात केली. यानंतर शहरातील सोमेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर येथे दर्शन व आशिर्वाद घेतले तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान वीर बिरसामुंडा, वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आणि निवडणूक निर्णय अधिकारी राजुरा यांचे कार्यालय गाठून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तथा सर्व घटक पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारसंघातील जवळपास १० हजार च्या वर नागरिक उपस्थित होते. Filed his nomination papers with a strong show of strength
या प्रसंगी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, राष्ट्रवादी (श. प) पक्षाचे अरूणभाऊ निमजे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाषसिंग गौर, विजयराव बावणे, शिवसेना उभाठा पक्षाचे नितीन पिपरे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अरुणभाऊ धोटे, आदिवासी नेते भिमराव पाटील मडावी, श्यामराव कोटणाके, सुग्रीव गोतावळे, नगराध्यक्षा सविता टेकाम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उत्तमराव पेचे, तुकाराम झाडे, गणपत आडे, नगराध्यक्षा सविता कुडमेथे, महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, आशाताई खासरे, सोनूताई दिवसे, नंदाताई मुसने, आशिफ सय्यद, सागर ठाकुरवार यासह राजुरा विधानसभा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) शिवसेना (ऊ. बा. ठा.) व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यासह जवळपास १० हजार च्या वर नागरिक उपस्थित होते.



