Two terrorizing youths arrested with sword and dagger
चंद्रपूर :- शहरातील बंगाली कॅम्प परिसरातील मुक्ती कॉलनी भागात हातात धारदार तलवारी घेऊन दहशत व भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या दोघांना रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वतः व गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत एक तलवार व एक कोयता अंदाजे किंमत 2000 रुपये जप्त करण्यात आल्या, दोन्ही आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Two terrorizing youths arrested with sword and dagger गोंडपिपरी कोठारी मार्गांवर दोन ट्रकांचा भीषण Crime चंद्रपुरात अवैध सुगंधित तंबाखू जप्त
रामनगर पोलीस ठाण्याचे Ramnagar Police Station अधिकारी व पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करीत असताना बंगाली कॅम्प परिसरात काही युवक दहशत माजवीत असल्याची माहिती प्राप्त झाली, सदर माहितीवरून पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख गुन्हे शोध पथकासह घटनास्थळी रवाना झाले असता मुक्ती कॉलनी परिसरात दोन युवक हातात तलवार व कोयता घेतलेल्या अवस्थेत आढळून आले यावरून आरोपी राजेश उर्फ पागळ्या शिवणकर (वय 40) व अनिल सिंग (वय 32) दोन्ही रा. अष्टभुजा वार्ड यांना ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे कलम 4, 25 भाहका सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. Chandrapur Crime
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उप विभागीय पोलीस अधिकारी सुधाकर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, गुन्हे शोध पथकाचे सपोनि देवाजी नरोटे, सपोनि उगले, पोहवा पेत्रस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, आनंद खरात, प्रशांत शेंद्रे, लालू यादव, नापोशी अमोल गिरडकर, मपोहवा मनीषा मोरे, संतोष कामडी, हिरालाल गुप्ता, रविकुमार ढेंगळे, प्रफुल पुप्पलवार, पंकज ठोंबरे, मपोशी ब्युटी साखरे यांनी केली.