Saturday, January 18, 2025
HomeCrimeचंद्रपुरात अवैध सुगंधित तंबाखू जप्त

चंद्रपुरात अवैध सुगंधित तंबाखू जप्त

Illegal flavored tobacco seized in Chandrapur

चंद्रपूर :- सुगंधित तंबाखू राज्यात प्रतिबंधक असताना चंद्रपुरात खुले आम विक्री सुरु असतानाचे चित्र आहे, याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाची डोळेझाक होताना दिसत आहे, अशातच स्थानिक गुन्हे शाखेने LCB Chandrapur बाबुपेठ येथे छापा टाकत 24125 रुपयांचा अवैध सुगंधित तंबाखू जप्त करीत, विक्रेत्याला ताब्यात घेत अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. Chandrapur Illegal Crime

चंद्रपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील बाबुपेठ परिसरातील गण्णूरवार चौकातील रोशन कामडी नामक इसम प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध पद्धतीने विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त होताच शाखेने धाड टाकत रोशन कामडी यास ताब्यात घेत त्याच्या घराची झडती घेतली असता घरात प्रतिबंधित अवैध सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने एकूण 25,125 रुपयांचा अवैध तंबाखू साठा जप्त करीत आरोपीवर चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. Illegal flavored tobacco seized in Chandrapur

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोउपनि मधुकर सामलवार, पो.हवा दीपक डोंगरे, संतोष येलपुलवार, गोपाल आतकुलवार, गोपीनाथ नरोटे आदी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular