Local crime branch seized illegal flavored tobacco
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने भिसी पोलीस ठाणे हद्दीत प्रतिबंधित अवैध सुगंधित तंबाखू तस्करी करणाऱ्या दोघांवर कारवाई करत इगल, हुक्का शिशा असा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा एकूण 1,19,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Local crime branch seized illegal flavored tobacco
स्थानिक गुन्हे शाखेच्याLCB पथकाने आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी भिसी पोलीस स्टेशन हद्दीत शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधित तंबाखू अवैद्यरित्या विक्री करणाऱ्या दोन आरोपी विरुद्ध कारवाई केली असून सदर कारवाई मध्ये इगल सुगंधित तंबाखू एकूण 438 नग प्रत्येकी 200 ग्रॅम, होला हुक्का शिशा तंबाखू (प्रत्येकी 200ग्रॅम वजनाचे 41 पॉकेट) एकूण 205 नग पाऊच, हुक्का शिशा तंबाखू (प्रत्येकी 40 ग्रॅम वजनाचे 07 पॉकेट) एकूण 84 नग व इगल हुक्का शिशा तंबाखू (प्रत्येकी 400 ग्रॅम वजनाचे 33 पॉकेट) 330 पाऊच असा एकूण 1,93,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन भिसी येथे अपराध क्र. 219/24 कलम 223, 274, 275 भान्यासं सहकलम 30 (2), 26 (2) (अ), 3, 4, 59 (1) अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 प्रमाणे गून्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु. शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात स. फौ. धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, पोहवा नीतीन कुरेकार,अजय बागेसर, पोकॉ प्रशांत नागोसे, शशांक बदामवार, चापोहवा दिनेश अराडे यांनी केली.



