Rajura murder case finally solved, Remarkable performance of Rajura Crime Branch Police
चंद्रपूर :- पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत मौजा रमाबाई वार्ड, राजुरा येथील कविता लक्ष्मण रायपुरे (53 वर्ष) आपले घरासमोरील गेटला कुलुप लावुन घरात एकटीच झोपून असताना कोणीतरी अज्ञात इसमाने घरात घुसुन धारधार शस्त्राने डोक्यावर मारुन तिचा खुन केला होता.
तक्रारीवरुन पोलीस स्टेशन राजुरा येथे अपराध क्र. 293/2025 कलम 103(1), 332 (ब) भा.न्या.सं. 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक चंद्रपुर, यांनी घटनास्थळाला भेट देवुन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे बाबत स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर व गुन्हे प्रकटीकरण शाखा राजुरा यांना आदेश दिले होते. Rajura murder case finally solved
आरोपीचा शोध घेत एकुण 6 दिवसात रात्रो – दिवस मेहनत घेवुन घटनास्थळ परीसरातील 15 ते 20 ठिकाणावरील सि.सि.टी.व्ही. फुटेज तपासण्यात आले, तसेच संशयाचे आधारावर एकुण 40 संशयीत इसमाकडे कसुन तपास केला परंतु आरोपीचा कोणताही सुगावा लागत नव्हता.
तरी गुप्त बातमीदार व तांत्रीक पुरावाच्या आधारावर तपास करुन सदर तपास अत्यंत क्लीष्ट स्वरुपाचा असतांना सुद्धा गुन्ह्यामध्ये विधीसंघर्षग्रस्त बालकास विश्वासात घेवुन सखोल विचारपूस केली असता विधीसंघर्षग्रस्त बालकाने गुन्ह्याची कबुली दिल्याने विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन गुन्ह्यात वापरलेले कोयता (हत्यार) हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला व विधीसंघर्ष ग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. Remarkable performance of Rajura Crime Branch Police
सदर गुन्ह्याचा तपास ठाणे प्रभारी अधिकारी पो.नि. सुमीत परतेकी, पो.स्टे. राजुरा हे स्वतः करीत आहे. Rajura Police Station
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. सुमीत परतेकी यांचे कुशल नेतृत्वात सपोनि निशा भुते, सपोनि हेमंत पवार गुन्हे प्रकटीकरण शाखाचे पोउपनि पांडुरंग हाके, भिष्मराज सोरते, पोउपनि चाटे, सफौ. किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पो.अं. महेश बोलगोडवार, शफीक शेख, शरद राठोड, अविनाश बांबोळे, आनंद मोरे यांनी केली.