Sunday, October 25, 2026
HomeSportजिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक रिदमिक स्पर्धेत दिव्यांशी शेंडेसह चार मुलींची बाजी

जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक रिदमिक स्पर्धेत दिव्यांशी शेंडेसह चार मुलींची बाजी

अंबुजा विद्या निकेतनच्या चार खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड; २६ ऑक्टोबरला नागपूर येथे स्पर्धा

चंद्रपूर :- जिल्हा स्टेडियम, चंद्रपूर येथे आयोजित महापालिका व जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक रिदमिक स्पर्धेत गडचांदूर (उपरवाही) येथील अंबुजा विद्या निकेतन स्कूलच्या चार विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले. दिव्यांशी आनंदपाल शेंडे हिच्यासह चारही खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. victorious at the district-level rhythmic gymnastics competition

महापालिका व जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन २४ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा स्टेडियम, चंद्रपूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत अंबुजा विद्या निकेतन स्कूल, उपरवाहीच्या दिव्यांशी आनंदपाल शेंडे, पोर्णिमा सत्तेदर सिंग, शुभ्रा नीलकंठ खरबे आणि स्वरा संजय मुंडे या चार विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी केली.

या कामगिरीच्या जोरावर चारही खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही विभागीय स्पर्धा २६ ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूर येथे होणार असून, या स्पर्धेतही त्या आपल्या कौशल्याची छाप पाडण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या यशाबद्दल अंबुजा विद्या निकेतन स्कूल, उपरवाहीच्या वतीने सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या यशामुळे शाळेसह परिसरातून आनंद व्यक्त केला जात असून, आगामी विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular