Workers spontaneously participated in the rally of sanitation worker Ratan Gaikwad
चंद्रपूर :- चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना एक साधारण घंटागाडी स्वच्छता कामगार, कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळविण्यासाठी कामगारांच्या आग्रहाने चंद्रपूर विधानसभेच्या रिंगणात उभे असलेले रतन गायकवाड यांची प्रचार रॅली मध्ये स्वच्छता कामगार मोठ्या संख्येने स्वयंमस्फूर्तीने सहभागी झाले, गायकवाड यांची रॅली विलक्षण व आकर्षक ठरली. Workers spontaneously participated in the rally of sanitation worker
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात मोठमोठे दिग्गज रिंगणात उभे आहेंत भाजपा, काँग्रेस तसेच राजकारणात सक्रिय असणारे अपक्ष उमेदवार ही उभे आहेंत, यात एक घंटागाडी वरील स्वच्छता कर्मचारी रतन गायकवाड कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा यासाठी रिंगणात उतरले आहेंत, आपले शक्तिप्रदर्शन करण्यासाठी दिनांक 16 व 17 नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेल्या रॅली मध्ये बाबुपेठ, भिवापूर, इंदिरा नगर, बंगाली कॅम्प, घुटकाळा व इतर भागातील मनपातील कंत्राटी कामगार तसेच स्वच्छता कर्मचारी स्वयंमस्फूर्तीने मोठ्या संख्येने सामील होत ‘ओळख कोणाची कचरा वाल्याची’ असे नारे देत, हातात निवडणूक चिन्ह ‘बादली’ घेऊन मोठ्या आत्मविश्वासाने पायदल फिरले. Chandrapur Assembly इलेक्टिव
बाबुपेठ परिसरातून सुरु करण्यात आलेल्या या आकर्षक रॅली ने सर्व चंद्रपूरकरांचे लक्ष केंद्रित केले.