Prohibited illegal flavored tobacco smuggled in a four-wheeler
चंद्रपूर :- महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू ची तस्करी करणाऱ्या वाहनाला स्थानिक गुन्हे शाखेने पाठलाग करीत भिसी पोलीस स्टेशन हद्दीत जप्त केले यात इगल सुगंधित तंबाखू, होला सुगंधित तंबाखू, पान पराग प्रीमियम मसाला चे पाकीट तसेच वाहतूक करणारे चारचाकी टाटा हॅरिअर वाहन असा एकूण 17,55,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Prohibited illegal flavored tobacco smuggler four-wheeler seized
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर LCB च्या पथकाला दिनांक 17 नोव्हेंबर रोजी प्रतिबंधित अवैध सुगंधित तंबाखू ची अवैध विक्री करिता वाहतूक तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली, माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने भिसी पोलिस स्टेशन हद्दीत टाटा हॅरीयर MH 44 S 3838 या चारचाकी वाहनाचा पाठलाग केला असता चालक पळून जाण्यात यशस्वी झाला, यावेळी वाहणात इगल सुगंधित तंबाखू 400 ग्रॅम चे 105 पाकीट, इगल तंबाखू 1 किलो चे 75 पाकीट, होला सुगंधित तंबाखू 1000 ग्रॅम चे 155 पाकीट, पान पराग प्रीमियम मसाला चे 80 पाकीट तसेच वाहतूक करणारे चारचाकी टाटा हॅरिअर वाहन असा एकूण 17,55,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Chandrapur Crime
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांचे नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोऊपनी मधुकर सामलवार, संतोष निंभोरकर, पोहवा सुरेंद्र महतो, संजय वाढई, पोहवा गणेश मोहुर्ले, प्रमोद कोटनाके आदी सर्व स्थानिक गुन्हे शाखेने केली.
