Thursday, April 24, 2025
HomeAccidentप्रत्येक नागरीकांच्या मदतीसाठी मी सदैव तत्पर - खा. प्रतिभा धानोरकर

प्रत्येक नागरीकांच्या मदतीसाठी मी सदैव तत्पर – खा. प्रतिभा धानोरकर

always ready to help every citizen – MP Pratibha Dhanorkar
Distribution of cheque’s to those injured in wild boar attack

चंद्रपूर :- खासदार प्रतिभा धानोरकर या आपल्या लोकसभा क्षेत्रातील नागरीकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आज त्यांच्या प्रयत्नांतून सलग 3 वर्षा आधीच्या रानडुकराच्या हल्ल्यातील जखमींना आपल्या प्रयत्नातून मदत मिळवून दिली.चंद्रपूर जिल्हा हा वन व्याप्त जिल्हा असल्याने वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडत असतात. या हल्ल्यात जखमी नागरीकांना वन विभागाकडून आर्थिक मदत दिली जात असते. परंतु हि मदत अनेकदा वेळेवर मिळत नसल्याची तक्रार खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कडे प्राप्त झाली होती.

सन 2021-22 मध्ये वरोरा तालुक्यातील विविध घटनेत पाच नागरीक रानटी डुकरांच्या हल्ल्यात जखमी झाले होते. परंतु तीन वर्ष लोटूनही त्यांना वन विभागाकडून मदत मिळाली नव्हती. या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विशेष प्रयत्न करुन जखमींना तात्काळ मदत मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले.
त्याची फलश्रृती म्हणून दि. 24 ऑगस्ट रोजी वन विभागाच्या उपस्थितीत रानटी डुकाराच्या हल्ल्यात जखमी झालेल्ल्या त्या पाच नागरीकांना प्रत्येकी 1 लक्ष 25 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप खासदार धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. Distribution of cheque’s to those injured in wild boar attack
त्यांच्या या कामाने जखमी कुटूंबातील सदस्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार मानले.
यावेळी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक राजु चिकटे, वरोरा काँग्रेस कमेटीचे ग्रामीण तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर त्या सोबतच वन विभागाचे अधिकारी व नागरीकांची उपस्थिती होती.
R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular