Saturday, January 18, 2025
HomeCrimeदुचाकी चोरी करून विक्री करणाऱ्या वाहनचोराला अटक

दुचाकी चोरी करून विक्री करणाऱ्या वाहनचोराला अटक

Vehicle thief selling two-wheelers arrested with 4 bikes

चंद्रपूर :- शहरातून तसेच लागतच्या शहरातून दुचाकी चोरून विक्री करणाऱ्या दुचाकी चोराला स्थानिक गुन्हे शाखेने LCB चोर खिडकी परिसरातून बाईक विक्री करिता गिर्हाईक शोधत असतांना Bike theft अटक केली, दरम्यान त्यांचेकडून चोरी केलेले 4 दुचाकी वाहने असा एकूण 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. Vehicle thief selling two-wheelers arrested with 4 bikes

आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर चे पथक पोस्टे रामनगर परिसरात पेट्रोलीग करीत असतांना खबर मिळाली की, रेकॉर्डवरिल वाहनचोर गुन्हेगार सुमोहीत उर्फ गोलु हा बिना कागदपत्राची एक काळया रंगाची फॅशन प्रो दुचाकी वाहन चोरी करून विकी करण्याच्या उददेशाने चोरखिडकी जवळील परिसरात संशयास्पद स्थितित फिरत आहे, Chandrapur Crime

या खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोर खिडकी परिसरात जावुन त्यारा ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातील मोटारसायकल चे कागदपत्राबाबत विचारपुस केली असता उडवाउडवीचे व असमाधानाकारक उत्तरे देवुन कोणतेही कागदपत्र नसल्याचे सांगायला लागला, त्यास विश्वासात घेवुन सविस्तर विचारपुस केली असता त्याने सदर गाडी ही अंदाजे चार दिवसाअगोर सांयकाळी अयप्पा मंदीरा तुकूम, चंद्रपुर येथिल पोहेकर जिम जवळून चोरलेली आहे असे कबूल केले. Local Crime Branch’s action

तसेच आरोपीला पोलिशीखाक्या दाखवला असता आणखी तिन मोटारसायकल त्यापैकी एक दुचाकी हि अंदाजे 4 – 5 दिवसापुर्वी रामनगर हदिदतुन बजाज पल्सर लाल काळया रंगाची, व एक दिवसापुर्वी भद्रावती परिसरातुन एक हिरो होन्डा स्पेलडर काळ्या रंगाची मोटारसायकल चोरली तसेच एक बेवारस होंडा अॅक्टीव्हा बाबुपेठ मधुन चोरून नेली असे मोटारसायकल चोरून तिन्ही दुचाकी वाहने पशुवैदयकिय दवाखाना चे पार्कीग मध्ये (चोर खिडकी जवळ) लपवुन ठेवली आहे. आम्ही सदर गाडयाचे गि-हाईक मिळाल्यानंतर गाड्या विकत होतो असे सांगितले.

यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पशु वैध्यकीय दवाखाना येथून एक काळया रंगाची पेंशन प्रो गाडी कंमाकं एम एच 29 ए एक्स या वाहनासह एक लाल काळ्या रंगाची बजाज पल्सर कं. एम एच 34 सि.जी. 2530, एक काळया रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस कं. एम एच 34 एस 1202 व एक बेवारस स्थितीत असलेली पांढ-या रंगाची होंडा अॅक्टीव्हा मोपेड गाडी क्र. एम.एच. 34 ए डब्लु 5282 अशी एकूण 4 दुचाकी असा एकुण 1,20,00,0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुचाकी चोर आरोपी व मुद्देमाल पोलीस स्टेशन रामनगर येथे पुढील कार्यवाहि करीता ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मनोज गदादे, पोलीस उप निरीक्षक विनोद भुरले, पोहवा दिपक डोंगरे, नापोकों संतोष येलपूलवार, पो.कॉ. नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, गोपीनाथ नरोटे, अमोल सावे, उमेश रोडे यांनी केली असुन पुढील तपास पोलीस ठाणे रामनगर येथील पोलीस करीत आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular