Housewife injured in gas explosion in Dhanoli MLA Subhash Dhote inspected.
चंद्रपूर :- कोरपना तालुक्यातील मौजा धानोली येथील भाष्कर पंधरे यांच्या पत्नी ज्योत्स्ना भाष्कर पंधरे सायंकाळी ६:३० वाजता च्या सुमारास स्वयंपाक करताना अचानकपणे सिलेंडर गॅस चा स्फोट होऊन त्यात त्या स्वतः जबर जखमी झाल्या असून घरातील अनेक जीवनावश्यक वस्तूंचे नासदुस झाले. यात अनेक मुल्यवान वस्तू खराब झाल्या तर घराचे छत, भिंती कोसळल्याने कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले. Housewife injured in gas explosion
सदर घटनेची माहिती मिळताच आमदार सुभाष धोटे MLA Subhash Dhote यांनी रात्री ११ वाजता च्या सुमारास धानोली गाठून पंधरे कुटुंबीयांची भेट घेऊन ज्योत्स्ना पंधरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली, कुटुंबीयांना धीर दिला. कुटुंबीयांचे झालेल्या नुकसानीचे पाहणी केली. कोरपनाचे तहसीलदार व्हटकर यांच्याशी संपर्क साधून पंधरे कुटुंबीयांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी कोरपना येथील कृ. उ. बा. स. संचालक भाऊराव चव्हाण, माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, उपसरपंच संजय जाधव, कदिर डेक, चंदू तोडासे यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.