VBA gave Gondpipri’s face in Rajura assembly constituency
Mahendra Singh Chandel declared as candidate
चंद्रपूर :- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली महायुती, महाविकास आघाडीने आपआपले बहुतांश उमेदवार जाहीर केले आहेंत यात वंचित बहुजन आघाडी ने युती तसेच आघाडी मध्ये न जाता एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने राजुरा विधानसभा क्षेत्रामधून गोंडपिपरी येथील महेंद्र सिंग चंदेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे याआधी चिमूर विधानसभा क्षेत्रामधून अरविंद सांदेकर तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून सतीश मालेकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. VBA announces Mahendra Singh Chandel’s candidature for Rajura assembly
राजुरा विधानसभा क्षेत्रात आजपर्यंत फक्त राजुरा तालुक्यातीलच उमेदवार व आमदार लाभले आहेंत, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पहिल्यांदाच गोंडपिपरी येथील स्थायी उमेदवाराला उमेदवारी जाहीर झाली आहे.
गोंडपिपरी भाग राजुरा विधानसभा क्षेत्रात नेहमीच उपेक्षित राहिल्याची भावना तालुकावासीय बोलत असतात.
गोंडपिपरी येथील स्थायी उमेदवार लाभल्याने गोंडपिपरीकरांची आशा पल्लवीत झाल्याचे बोलल्या जात आहे.
यामुळे महेंद्र सिंग चंदेल यांच्या उमेदवारीने ‘काटे की टक्कर’ होणार असे जनसामान्य नागरिकांमधून बोलल्या जात आहे.