Saturday, January 18, 2025
HomeMNC Chandrapurपूर्वसूचना न देता घराची तोडफोड : मनपा सहाय्यक आयुक्त व कर्मचाऱ्यांवर फौजदारी...

पूर्वसूचना न देता घराची तोडफोड : मनपा सहाय्यक आयुक्त व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा

Vandalism of house without prior notice: File a criminal case against municipal assistant commissioner and employees

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका झोन क्रमांक 3 चे सहाय्यक आयुक्त व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना, पंचनामा तसेच दुसऱ्यां पक्षाची बाजू विचारात न घेता घरासमोरील गेट तोडले व घरच्या महीलांसोबत अरेरावी केली. पदाचा गैरवापर करणाऱ्या मनपाच्या सहायक आयुक्त व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी दिनेश रामदास सोनटक्के यांनी आयोजित श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रपरीषदेत केली आहे.

बंगाली कैम्प नेहरू नगर वार्ड निवासी सुरेश गोमाजी भोयर हा घराच्या शेजारी राहत असून तो प्रेम संबंधाने अंगण खाली असल्याने येणे जाणे करत होता. त्यांचा मुख्य रस्ता हा घराच्या पूर्वेकडून रहदारी करीता आहे. परंतु सुरेश भोयर यांनी तकादा व भांडण करून अंगणामधून नेहमीकरता पक्का रस्ता पाहिजे अशी बळजबरी करीत होता. परंतु ती जागा दिनेश च्या स्व:मालकीची असल्यामुळे त्या जागेवर बांधकाम करण्यास गेल्यास मज्जाव करीत होता. यासंदर्भात सोनटक्के यांनी महानगरपालिका कार्यालय बंगाली कॅम्प झोन क्र. 3 येथे तक्रार केली अशी माहिती दिनेश सोनटक्के यांनी दिली.

2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दिनेश व मंगेश सोनटक्के दुकानात गेले असता घरातील फक्त महिला घरी होत्या. मनपा झोन क्रमांक 3 चे सहाय्यक आयुक्त माकोडे यांच्या सांगण्यावरून मनपा चे 10 ते 12 कर्मचारी घन, हातोडे, पावडे (इत्यादी साहित्य) चारचाकी वाहन घेऊन आले व कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना, कसलाही नोटीस न, कुठलाही पंचनामा न करता तसेच दूसऱ्या पक्षाची बाजू न ऐकता घरासमोरील गेट तोडण्यास सुरूवात केली. यावेळी घरातील महीलांनी विरोध केला असता कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की करत अरेरावी केली. बळजबरीने लोखंडी गेट तोडले तसेच घरासमोरील 2 कुलर उचलुन वाहनात टाकुन घेऊन गेले. हे पदाचा गैरवापर करणारी असून अन्याय करणारी आहे. मनपा कर्मचारी व सहाय्यक आयुक्त माकोडे यांना जाब विचारण्यास त्यांचे कार्यालयात गेले असता त्यांनी भेटण्यात नकार दिला.

यासंदर्भात जिला पुलिस अधिक्षक व मनपा आयुक्त यांना तक्रार केली असल्याची माहीती देण्यात आली. पदाचा गैरवापर करणाऱ्या मनपा चे सहाय्यक आयुक्त व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी दिनेश सोनटक्के यांनी केली आहे.

पत्रकार परीषदेला दिनेश रामदास सोनटक्के, मंगेश रामदास सोनटक्के, पार्वताबाई रामदास सोनटक्के, मेघा दिनेश सोनटक्के, विठ्ठल काशीनाथ भोयर, सिमा विठ्ठल भोयर उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular