General Conference of National OBC Federation to be inaugurated by Hansraj Ahir on August 7 at Amritsar
चंद्रपूर :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे National OBC Federation नववे राष्ट्रीय महाअधिवेशन पंजाब राज्यातील अमृतसर येथे दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी होत असून या महाअधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हसराज अहीर Hansraj Ahir यांचे शुभहस्ते होणार आहे.
या महाअधिवेशनाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय पदाधिकारी, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र व अन्य राज्यातील मंत्री, खासदार, आमदार व निमंत्रीत मान्यवर अतिथी उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनासाठी चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा व अन्य जिल्ह्यातून शेकडो ओबीसी समाजबांधव उपस्थित राहणार असून या अधिवेशनात ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व अन्य क्षेत्राशी निगडीत धोरणांवर ऊहापोह होणार असल्याने या अधिवेशनास ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.