Uncured flavored tobacco worth 7 lakh 58 thousand seized from Chandrapur city
चंद्रपूर :- चंद्रपुर जिल्हयात वाढती गुन्हेगारी व अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी LCB स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना आदेशीत केले होते. Chandrapur Crime
पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना शहरात प्रभावी पेट्रोलींग करून अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने दिनांक 8ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी गोपनीय माहीती वरून स्थागुशा येथिल अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. रामनगर हददीमध्ये पेट्रोलींग करीता असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, प्रेमकुमार बाबुराव बेले, धंदा- पान मटेरीअल विकी. दत्त नगर नागपुर रोड चंद्रपुर हा आपले पान मटेरिअलचे दुकाणात व घरी अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु बाळगुण विकी करीत आहे. Uncured flavored tobacco seized from Chandrapur city
अश्या खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखेने त्याचे घरी छापा मारला असता दुकाणामध्ये व घरी अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु आढळून आला यात एकुण मुददेमाल 7,58,096 रुपयांचा माल जप्त करून आरोपी विरूध्द पो.स्टे. रामनगर येथे अपराध कमांक 932/2024 कलम 223, 275, 123 भारतीय न्याय संहिता 2023, सहकलम 30 (2), 26(2) (प), 26 (2) (पअ), 59 अन्न सुरक्षा आणी मानके अधिनियम गुन्हा नोंद करण्यात आला. Proceedings of Chandrapur Local Crime Branch
सदर कर्यवाही स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे मार्गदशनात पोउपनि. संतोष निभोरकर, पोउपनि. विनोद भुरले, पो.हवा. जयंत चुनारकर, नितेश महात्मे, चेतन गज्जलवार, पोअं. किशोर वाकाटे, अमोल सावे, प्रफुल गारघाटे, चापोहवा दिनेश अराडे यांनी केली आहे.