Thursday, April 2, 2026
HomeCrimeघरफोडी प्रकरणात दोन आरोपींना अटक

घरफोडी प्रकरणात दोन आरोपींना अटक

Two accused arrested in house burglary case

चंद्रपूर :- घरफोडी प्रकरणात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने LCB दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ८६ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १६ सप्टेंबर) रामनगर हद्दीत करण्यात आली. Two accused arrested in house burglary case चंद्रपूर मनपा भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी IAS अधिकारी नेमा

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी निमवाटिका, रयतवारी कॉलरी परिसरात आणला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयित इसमाला ताब्यात घेतले. अंगझडती दरम्यान सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून आली. चौकशीत आरोपींनी वरोरा व भद्रावती येथील घरफोड्यांची कबुली दिली.

या कारवाईत वरोरा पोलीस ठाण्यातील 2 व भद्रावती पोलीस स्टेशन येथील एक गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे. आरोपी रामण्णा दशरथ दांडेकर (२९, रा. वरोरा) आणि अरुण लिलाधर साहा (३२, मूळ रा. सीतामढी, बिहार, सध्या रा. अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर) यांना अटक करण्यात आली असून अरविंद सातपुते (रा. वरोरा) व अर्जुन दांडेकर (रा. ब्रम्हपुरी) हे दोन आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

जप्त केलेला मुद्देमाल व आरोपी पुढील तपासासाठी वरोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. Chandrapur Local Crime Branch action

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि. संतोष निंभोरकर, पोउपनि. सर्वेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली पो.ह.वा. नितीन साळवे, नितीन कुरेकर, प्रमोद कोटनाके, चा.पो.ह.वा. गजानन मडावी, पो.आ. अमोल सावे आणि प्रसाद धुळगंडे यांनी केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular