Tuesday, June 2, 2026
HomePoliceमहाकाली यात्रेनिमित्त चंद्रपुरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

महाकाली यात्रेनिमित्त चंद्रपुरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

Changes in Traffic Arrangements in Chandrapur City on Account of the Mahakali Yatra

चंद्रपूर :- मंगळवार (दि. 24) पासून चंद्रपूर येथे माता महाकाली यात्रा सुरू होत आहे. महाकाली यात्रेमध्ये येणाऱ्या प्रवाशांना /भाविक, यात्रेकरूंना जाण्याकरीता एकेरी मार्ग आहे. त्यामुळे जटपुरा गेट येथे यात्रेच्या कालावधी दरम्यान जास्त गर्दी होत असते. त्या अनुषंगाने शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. Changes in Traffic Arrangements in Chandrapur

महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 33 (1) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व नियमनासाठी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी चंद्रपूर शहरातील रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास अगर गैरसोय होऊ नये, याकरीता 24 मार्च ते 4 एप्रिल 2026 या कालावधीत शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केले आहे. Mahakali Yatra

सदर कालावधीत अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग सायकलखेरीज सर्व वाहनांकरीता बंद राहील. तसेच अंचलेश्वर गेट ते बागला चौक, अंचलेश्वर गेट ते कोहिनुर तलावकडे जाणारा रोड व महाकाली मंदीर पार्कींग ते आर. के. चौक ‘नो पार्कीग झोन’ व ‘नो हॉकर झोन’ घोषित करण्यात येत आहे. महाकाली मंदीर समोरून गौतम नगरकडे जाणारा रोड सर्व वाहनाकरिता प्रवेशबंद राहणार आहे.

नागरिकांसाठी पर्यायी मार्ग : 1) बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शहरात जाण्यासाठी व परत येण्यासाठी भिवापूर-हनुमान खिडकी-दादमहल वार्ड या मार्गचा वापर करावा. सदरचा मार्ग हा मोटार सायकल व ऑटो यासाठीच राहील. 2) बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना चारचाकी वाहनाने शहरात जायचे असल्यास किंवा बाहेर जायचे असल्यास लालपेठ कॉलरी- पठाणपुरा गेट-गांधी चौक या मार्गाचा वापर करावा. तसेच शहराबाहेर इतरत्र जायचे असल्यास कामगार चौक मार्गे बायपास रोडचा वापर करावा.

यात्रेत येणाऱ्या वाहनाकरीता पार्कींग व्यवस्था पुढीलप्रमाणे : 1) कोहीनुर तलाव मैदान येथे जिप, कार, (टॅम्पो, आईचर आणि त्यापेक्षा मोठे जड वाहनांना या पार्कींग स्थळी प्रवेश दिला जाणार नाही) 2) इंजिनिअरींग कॉलेज ते भिवापुर मार्केटच्या रस्तयाची दोन्ही बाजु येथे तेलंगाना व आंध्रप्रदेशातुन येणा-या बसेसची पार्किंग 3) डी.एड. कॉलेज मैदान (जुनी बाबुपेठ पोलिस चौकीच्या बाजुला ) सर्व प्रकारच्या वाहनांची पार्किंग 4) न्यु इंग्लिश हायस्कूल मैदान येथे राज्य परिवहन बसेस करीता, 5) बैलबाजार पार्कीग क्रं. 1 व पार्कींग क्रं. 2 येथे सर्व प्रकारचे वाहन 6) नायरा पेट्रोल पंप (बायपास रोड, आंबेडकर चौक) येथे सर्व प्रकारच्या वाहनांची पार्किंग राहील.

वरिल निर्देशाचे पालन करून जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular