Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomeAccidentचंद्रपूरातील वेकोली अधिकारी जितेंद्र नगरकर यांचा कोरबा खदान अपघातात मृत्यू

चंद्रपूरातील वेकोली अधिकारी जितेंद्र नगरकर यांचा कोरबा खदान अपघातात मृत्यू

WCL officer in Chandrapur dies in Korba mine accident

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील रहिवासी असलेले जितेंद्र नगरकर वय 43 वर्ष, एसईसीएल SECL कोरबा येथे खदान परिसरात अधिकारी पदावर कार्यरत असतांना पाण्याचा प्रवाह वाढल्याने निरीक्षणा करिता गेले असता त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

कोरबा येथील कुसमुंडा खदान परिसरात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने जितेंद्र नगरकर व इतर एक अधिकारी निरीक्षण करण्यासाठी गेले असता अचानक पाण्याचा प्रभाव वाढल्याने दोघेही वाहून गेले यात चंद्रपूर निवासी जितेंद्र नगरकर यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या अधिकारी यांना काढण्यात यश आले.

Oplus_0

सदर घटनेने खदान परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून एन डी आर एफ च्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

जितेंद्र नगरकर वय 43 वर्ष, रा. घुटकाळा वार्ड, चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई दोन भाऊ असा बराच मोठा परिवार आहे. यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चंद्रपूरातील डॉ. योगेंद्र नगरकर, होमिओपॅथी यांचे ते बंधू आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular