चंद्रपूर :- माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी Former Prime Minister and Bharat Ratna late Rajiv Gandhi यांच्या दूरदृष्टी आणि आधुनिक विचारांमुळेच आज देशात डिजिटल व तंत्रज्ञान क्रांती झाली असून, आपण अनेक कामे सहज व वेगाने करू शकत आहोत. गांधी घराण्याने देशाच्या अखंडतेसाठी आणि विकासासाठी मोठे त्याग व बलिदान दिले आहे. या घराण्याचे भारतावर अमूल्य उपकार असून ते देशवासीय कधीही विसरू शकत नाहीत, असे प्रतिपादन MP Pratibha Dhanorkar खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. Technological revolution in the country due to Rajiv Gandhi’s vision

देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर येथील ‘राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी’ येथे आयोजित ‘सद्भावना दिन’ कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. उपस्थितांशी संवाद साधताना त्या पुढे म्हणाल्या की, राजीव गांधी यांनी तरुण वयात देशाची धुरा सांभाळताना संगणक युगाची आणि २१ व्या शतकातील भारताची भक्कम पायाभरणी केली. आज माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत जगात अग्रस्थानी दिसतो, त्याचे श्रेय राजीवजींच्या दूरदृष्टीला जाते. आपण गांधी परिवाराचे सदस्य म्हणून काम करत असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे.
याप्रसंगीत ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे म्हणाले कि, स्वातंत्र्यसंग्रामापासून ते आधुनिक भारताच्या उभारणीपर्यंत गांधी घराण्याचे योगदान अतुलनीय आहे. देशाच्या हितासाठी प्राणांचे बलिदान देणारे हे एकमेव घराणे असून त्यांनी कायम जनसेवेचा मार्ग स्वीकारला आहे. स्वर्गीय राजीवजी गांधी यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी दिलेले योगदान आणि सामाजिक सलोख्याचा संदेश आजही आपल्याला प्रेरित करतो. समाजात शांतता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता कायम राखणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, शफिक अहमद, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, शहर जिल्हाध्यक्ष शिवा राव, काँग्रेस गटनेते नगरसेवक सुरेंद्र अडबाले, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, महिला जिल्हाध्यक्ष कुंदा जेणेकर, शहर महिला अध्यक्ष चंदा वैरागडे, जनविकास सेनेचे नगरसेवक पप्पू देशमुख , प्रोफेशनल काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, झोन सभापती रामनरेश यादव, झोन सभापती वैशाली चंदनखेडे, ओबीसी शहर अध्यक्ष नगरसेवक राहुल चौधरी, प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
