Sword seized in Ballarpur: Chandrapur local crime branch action
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या वतीने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने LCB सापळा रचून बल्लारपूर शहरातून एका घरातून धारदार तलवार जप्त केली आहे. Sword seized in Ballarpur
जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस यांच्या द्वारे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. Chandrapur Crime
दिनांक 9 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बल्लारपूर शहरातील एका युवकाकडे तलवार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली यावरून पथकाने सापळा रचून पंचांसमक्ष घराची झडती घेत घरातून धारदार तलवार जप्त केली.
आरोपीवर भारतीय हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करीत पुढील तपासासाठी बल्लारपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली पोहवा नितेश महात्मे, दिपक डोंगरे, प्रमोद कोटनाके, अमोल सावे, गोपीनाथ नरोटे, दिनेश आराडे आदी सर्व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.