Monday, April 20, 2026
HomeEducationalतब्बल २० वर्षांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा पुन्हा भरला वर्ग

तब्बल २० वर्षांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा पुन्हा भरला वर्ग

Student-teacher bonding ceremony at Jawaharlal Nehru Vidyalaya Awalpur

चंद्रपूर :- कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या शाळेची घंटा वाजली आणि वर्गात येण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली. मात्र, हे विद्यार्थी होते शाळेचे माजी विद्यार्थी. कारण होते २००७ च्या दहावीच्या बॅचतर्फे आयोजित विद्यार्थी-शिक्षक स्नेहमिलन सोहळ्याचे. या सोहळ्यास शाळेचे माजी शिक्षकदेखील उत्साहाने उपस्थित राहिले आणि त्यांनी मोठ्या उत्साहाने या विद्यार्थ्यांची पुन्हा शाळा घेतली. २००७ च्या दहावीच्या बॅचने १ मार्च रोजी हे स्नेहसंमेलन शाळेच्या वास्तूतच आयोजित केले होते. विविध ठिकाणी स्थायिक झालेले विद्यार्थी या निमित्ताने मोठ्या उत्साहाने एकत्र जमले. Student-teacher bonding ceremony

विद्यार्थ्यांना शिकवणारे मुख्याध्यापक मेश्राम, शिक्षक राहूल बोढे, प्रा.धोपटे, निब्रड, प्रा.काकडे, प्रा.टेकाम, प्रा.जुमडे, झाडे, यांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरली. यावेळी शिक्षकांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार विद्यार्थांनी केला. विद्यार्थी व शिक्षकांनी गतकाळातील आठवणींना उजाळा दिला. शाळेचे वैभव राखण्याचे आवाहन करत समाजात चांगला माणूस म्हणून जगण्याचा गुरुमंत्र यावेळी शिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. जवळपास २० वर्षांनंतर भेटलेल्या या वर्गमित्रांनी एकमेकांची आपुलकीने विचारपूस केली. मात्र केवळ भेटीगाठी हाच हेतू नव्हता, आपल्या आयुष्याचा पाया रचणाऱ्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हीच खरी भावना सर्वांच्या मनात होती. Class of 10th students filled up again after 20 years

या कार्यक्रमाचे नियोजन सुरेंद्र धोटे, राजेंद्र अण्णाला, प्रफुल्ल कापसे, सतिश पाचभाई आदी विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन स्नेहल कन्नाके हिने केले तर आभार अविनाश पोईनकर यांनी मानले. यावेळी विविध ठिकाणी कार्यरत असलेले २००७ मधील दहावीचे विद्यार्थी युगल जीवने, क्रिष्णा उईके, वसीम शेख, प्रफुल्ल क्षिरसागर, प्रशांत टोंगे, प्रशांत कामटकर, केतन झाडे, साईनाथ कुळसंगे, वैभव गेडाम, विजय कोटांगले, आविष्कार मेश्राम, प्रियंका कुमरे, प्रविण वनकर, सचिन येलेकर, भीमराव फुलझेले, संदीप नगराळे, स्नेहल हाडके, अर्षद खान, फिरोज शेख, प्रतिभा सोनटक्के, जूही उमरे, पूजा खाडे, आकाश मून, वंदना कुमरे, स्नेहल कन्नाके, प्रफुल्ल पवार, सुनिता दुबे, छाया उईके, मंजूषा सोयाम, नकुल येरोजवार, स्वप्नील कोल्हे, प्रज्ञा शिलारकर, सचिन वनकर, प्रीती पिंपळकर, प्रीती कातकर, दिनेश ठावरे, ईश्वर कन्नुरवार, सागर निंगोट, अभिजित कुलसंगे, विशाल तांबरे, राहूल सहारे आदी उपस्थित होते.

शाळेच्या आवारात काही काळ आनंदात वेळ घालवल्यानंतर सर्वांनी आठवणींची शिदोरी हृदयात साठवून एकमेकांचा निरोप घेतला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular