Monday, April 20, 2026
HomeSocialसांस्कृतिक कार्यक्रम व क्रिकेट सामन्यांचे आयोजन

सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिकेट सामन्यांचे आयोजन

Kamal Sporting Club organizes cultural programs and cricket matches at Ghugghus

चंद्रपूर :- कला, संस्कृती व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कमल स्पोर्टींग क्लब, चंद्रपूरच्या वतीने घुग्घूस येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व शॉर्ट सर्कल क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले. पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर Hansraj Ahir व चंद्रपूर क्षेत्राचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी घुग्घूस न.प.तील भाजप गटनेते मिना राजेश मोरपाका यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. Kamal Sporting Club organizes cultural programs and cricket matches at Ghugghus

            सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिकेट सामन्यांच्या बक्षिस वितरण कार्यक्रमास चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे व कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष, युवा नेते रघुवीर अहीर, सामाजिक कार्यकर्ता प्रसाद जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

या कार्यक्रमास सर्वश्री संजय तिवारी, स्वीकृत नगरसेवक निरक्षण तांद्रा, नगरसेवक विवेक बोढे, नगरसेवक आशिष माशिरकर, नामदेव डाहुले, नगरसेवक गणेश पिंपळकर, युवा सेनेचे (शिंदे) हर्षल शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष विनोद खेवले, मयुर भोकरे, श्रृती ढवस आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

            बक्षिस वितरण कार्यक्रमाचे अतिथी रविंद्र शिंदे यांनी कमल स्पोर्टींग क्लबच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याची प्रशंसा करून रघुवीर अहीर यांच्या मार्गदर्शन व पुढाकारात जिल्ह्यातील युवक, युवतींना विविध क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य कमल स्पोर्टींग क्लबच्या माध्यमातून होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

            क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर यांनी कमल स्पोर्टींग क्लबच्या मागील 25 वर्षाच्या यशस्वी कार्याबद्दल उपस्थितांना माहिती देत क्लबच्या माध्यमातून शहरी व ग्रामिण युवक, युवती, विद्यार्थी व क्रीडा क्षेत्राशी निगडीत खेळाडूंना विविध कार्यक्रमाचे आयोजन करून संधी देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. या सांस्कृतिक नृत्य व क्रिकेट स्पर्धेत ग्रामिण क्षेत्रातील युवक, युवतींना त्यांच्या अंगभुत कौशल्याचे प्रदर्शन करण्यास वाव मिळत असल्याची भावना व्यक्त केली.

            यावेळी मान्यवर, अतिथींच्या शुभहस्ते दि. 02 मार्च 2026 रोजी बक्षिस वितरण करण्यात आले. यात ग्रुप नृत्य स्पर्धेतील प्रथम पारीतोषीक पीएसडी क्रु नागपुर, द्वितीय पतण क्रु चंद्रपूर व तृतीय ईडीसी क्रु चंद्रपूर यांना, सोलो नृत्य स्पर्धेतील प्रथम पारीतोषीक सुरज धनुष, द्वितीय सौम्य नागपुर या विजयी स्पर्धकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच क्रिकेट स्पर्धेतील प्रथम पारीतोषीक जय भवानी क्रीडा मंडळ बाबुपेठ, द्वितीय आझादयुथस अमराई (घुग्घूस), तृतीय जय श्रीराम क्रीडा मंडळ, तिलकनगर (घुग्घूस) या विजयी चमुस बहिरम बाबा चषक 2026 देऊन गौरवान्वित केले. कार्यक्रमाच्या सफलतेकरिता राजेश मोरपाका, पवन पुरेल्ली, गौरव ठाकरे, सतिश बोंडे, निरज यादव व क्लबचे पदाधिकारी व स्थानिक युवकांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेला प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती लाभली होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular