Issue regarding ₹5 court fee stamps resolved through the initiative of MLA Sudhir Mungantiwar
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून भासत असलेल्या ५ रुपयांच्या कोर्ट फी तिकिटांच्या तुटवड्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, आमदार सुधीर मुनगंटीवार MLA Sudhir Mungantiwar यांच्या पुढाकाराला यश आले आहे. वकील, त्यांच्या कारकूनांसह सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारी ही समस्या सोडविण्यासाठी आ. मुनगंटीवार यांनी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तथा नोंदणी व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला होता. त्यांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाने तातडीने आवश्यक कार्यवाही करत चंद्रपूर जिल्हाभर ५ रुपयांच्या कोर्ट फी तिकिटांची उपलब्धता सुनिश्चित केली आहे. Issue regarding ₹5 court fee stamps resolved महिला आयोगाला बळकटी देण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका…….
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये अनेक वर्षांपासून ५ रुपयांच्या कोर्ट फी तिकिटांचा तुटवडा जाणवत होता. परिणामी, अनेक अर्जांवर आवश्यक असलेले ५ रुपयांचे तिकीट उपलब्ध नसल्यामुळे नागरिक, वकील आणि इतर विधी व्यावसायिकांना १० रुपयांची कोर्ट फी वापरण्याची वेळ येत होती. त्यामुळे अनावश्यक आर्थिक भार आणि गैरसोयीचा त्यांना सामना करावा लागत होता. 51 गुन्ह्यातील 66 लाखांचा अंमली पदार्थ नष्ट……
या समस्येची गंभीर दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तथा नोंदणी व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांना पत्र पाठवून चंद्रपूर जिल्ह्यास ५ रुपयांच्या कोर्ट फी तिकिटांचा पुरेसा पुरवठा करण्याची विनंती केली. त्यांच्या पत्राची तातडीने दखल घेत नोंदणी महानिरीक्षकांनी जिल्हा मुद्रांक प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलत ५ रुपयांच्या कोर्ट फी तिकिटांची जिल्हाभर उपलब्धता सुनिश्चित केली. त्यामुळे अनेक वर्षांपासून भेडसावत असलेला प्रश्न मार्गी लागला असून, वकील, विधी व्यावसायिक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. Relief for lawyers, legal professionals, and citizens राम मंदिर मे चंदा और दान की कथित लूट…..
या निर्णयामुळे जिल्हा न्यायालयातील शेकडो वकील, वकिलांचे कारकून, इतर विधी व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठी सोय झाली आहे. ५ रुपयांच्या कोर्ट फी तिकिटांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल अॅड. योगेश्वर पचारे यांनी सर्व वकिलांच्या वतीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे. जनतेच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी तत्परतेने पाठपुरावा करून परिणामकारक कार्यवाही घडवून आणणे, ही आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीची आणखी एक प्रचिती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
