Stop Abandonment in District Hospital, Else Violent Agitation.. Warning through Rpi (A)
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रूग्णालयात MRI एम.आर.आय. टु.यु.को. व सि.टी.स्कॅन मशीन CT Scan Machine बंद असल्यामुळे येथील रुग्णांना व रुग्णांच्या नातलगांना अनेक प्रकारच्या समस्यांना समोर जावे लागत आहे. रुग्णांना औषधं व इतर साहीत्यांची आवश्यकता पडल्यास बाहेरून आणण्याचा सल्ला देण्यात येतो. तोपर्यंत रुग्ण गंभीर होतो आणी कधी काळी दगावतो सुद्धा, यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयातील दुकानदारी बंद करून उक्त मशीन रुग्णांना उपलब्ध कराव्या आणि गरोधर महिलांसाठी अधिकचे बेड व सुखसुविधा उपलब्ध करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले RPI (A) गटाच्या जिलाध्यक्षा प्रिया खाडे यांनी आयोजित पत्रकार परीषदेत केली मागण्या पूर्ण न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. Stop Abandonment in District Hospital
चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील गोरगरीब लोक रूग्णालयावर तसेच प्रशासनावर विश्वास ठेवीत उपचारार्थ चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात येतात, तेव्हा त्यांना आवश्यक त्या व्यवस्था उपलब्ध पाहिजेत त्या उपलब्ध होत नाही. गोरगरीब रुग्णांना काही औषधी बाहेरच्या खाजगी मेडीकल मधुन अधिकच्या भावात विकत घ्यावे लागतात आणि पर्याय नसल्यामुळे त्यांना घेणे आवश्यक असते. त्या कारणामुळे त्यांना वाजवीपेक्षा जास्तीचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
रूग्णालयातील कार्यरत वैद्यकिय अधिकारी एम.आर.आय., दु.यु.को. मशीन व सि.टी. स्कॅन रूग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे बाहेरील खाजगी रूग्णालयातुन करून आणायला सांगतात. त्यामुळे गोरगरीब लोकांना बाहेर खर्च करण्याकरीता त्यांच्याकडे पैसा उपलब्ध नसतो तसेच त्यांची आर्थिक दुष्टया कमकुवत असलेल्या रूग्णांना व रूग्णाच्या नातेवाईकांना फार मोठ्या प्रमाणात मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने एम.आर.आय., दु.यु.को. मशीन व सि.टी. स्कॅन रूग्णालयात उपलब्ध करावी.
गरोदर महिलांना वार्डमध्ये बेडची कमतरता असल्यामुळे गरोदर महिलांना तसेच प्रसुती महिलांना छोटयाशा बाळाला घेवुन खाली फरशीवर 2 ते 3 दिवस बाळाला घेवुन खाली बसावे व झोपावे लागत आहे. यामुळे रूग्णालय प्रशासनकडुन त्यांची हेडसांड होत आहे.
यासंदर्भात रूग्णालय प्रशासनाकडे रिपाई (आ) च्या वतीने वारंवार पत्रव्यवहार करूनही याकडे दुलर्क्ष करण्यात येत असल्याने रूग्णालयातील समस्यांना घेऊन रिपाई (आ) च्या वतीने जनआक्रोश मोर्चा शांततारित्या काढण्यात आला. आगामी 10 दिवसात रूग्णालयातील समस्यांचे समाधान न केल्यास रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनतेच्या वतीने आमरन उपोषण केल्या जाईल व याची संपूर्ण जिम्मेदारी प्रशासनाची राहील असा इशारा प्रिया खाडे यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी पत्रपरिषदेला ज्ञानेश्वर नगराळे, विकीराज वानखेडे, खुशाबराव सिडाम, रेखा रामटेके, माया रामटेके आदि उपस्थित होते.