Thursday, April 16, 2026
HomeMaharashtraराज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा १० ऑगस्टला चंद्रपूरात

राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा १० ऑगस्टला चंद्रपूरात

State-level bride-groom introduction meet on August 10 in Chandrapur

चंद्रपूर :- बौद्ध समाजातील तरुण-तरुणींना योग्य जीवनसाथी मिळावा यासाठी बौद्ध मंगल परिणय ग्रुप, नागपूर यांच्यावतीने १० ऑगस्ट रोजी रविवार, सकाळी १२ ते दुपारी ४ या वेळेत श्रमिक पत्रकार भवन, वरोरा नाका, चंद्रपूर येथे राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. State-level bride-groom introduction meet

ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये २७% आरक्षण कायम

या उपक्रमाची माहिती सहयोग कल्याणकारी बहुजन संस्था, नागपूर च्या वतीने अ‍ॅड. पुष्पा ढाबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बौद्ध मंगल परिणय ग्रुप गेल्या साडेचार वर्षांपासून विदर्भात कार्यरत असून, आजपर्यंत २५ यशस्वी विवाह घडवून आणले आहेत. यावेळी चंद्रपूरमध्ये प्रथमच हा मेळावा होत आहे. सध्या विदर्भातून १५० ते २०० युवक-युवतींची नोंदणी झाली असून, त्यात २० ते २५ जण चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याची माहिती देण्यात आली आहे. Initiative of Buddhist Mangal Parinaya Group

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नाममात्र योगदान शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाला संस्थेचे मुख्य संयोजक नरेश गायकवाड, दयाराम गावंडे, अ‍ॅड. पुष्पा ढाबरे, प्रमोद सोमकुवर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेत अ‍ॅड. पुष्पा ढाबरे व प्रमोद सोमकुवर यांनी पुढील माहिती दिली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular