Thursday, April 16, 2026
HomeAgricultureमहसूल सप्ताह अंतर्गत नारंडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम

महसूल सप्ताह अंतर्गत नारंडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम

Tree plantation at Naranda under Revenue Week

प्रमोद खिरटकर
कोरपणा तालुका प्रतिनिधी

कोरपना:- राज्य शासनाच्या निर्देशानुसार 1 ते 7 ऑगस्ट 2025 दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाअंतर्गत 3 ऑगस्ट रोजी “पाणंद/शिवरस्ते मोजणी करून अतिक्रमणमुक्त करणे व त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड” हा विषय घेऊन विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. Tree plantation at Naranda under Revenue Week

या कार्यक्रमाचे आयोजन कोरपना तालुक्यातील नांरडा गावात सकाळी 12:00 वाजता करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास MLA Devrao Bhongale आमदार देवरावदादा भोंगळे (राजुरा विधानसभा क्षेत्र) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासह , तहसीलदार पल्लवी आखारे मॅडम, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत कोरपना तालुक्यातील प्रत्येक मंडळातील गावा-गावांमध्ये अतिक्रमणमुक्त पाणंद रस्त्यावर दुतर्फा झाडे लावण्याच्या उपक्रम राबविण्यात आला. तसेच अतिक्रमण असलेले पांदण रस्ता त्यांच्यावरील अतिक्रमणे ओळखून अतिक्रमणमुक्तीची कारवाई करण्यात येणार आहे. .झाडांची देखभाल व संरक्षणासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, शेजारील शेतकरी आणि ग्रामस्थ यांचा सहभाग सुनिश्चित करण्यात आला.

लागवडीनंतर झाडांची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आली आहे, जेणेकरून दीर्घकालीन संवर्धन शक्य होईल.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास व पर्यावरण संवर्धन एकत्र साधले गेले.

तसेच आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या हस्ते संजय गांधी योजनेचे लाभार्थी यांना लाभ मंजुरीचे आदेश वाटप करण्यात आले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular