Monday, October 19, 2026
HomeEducationalगडचांदूर येथे गोंडवाना विद्यापीठ परीक्षा उत्तरपत्रिका संकलन केंद्र सुरू करा

गडचांदूर येथे गोंडवाना विद्यापीठ परीक्षा उत्तरपत्रिका संकलन केंद्र सुरू करा

चंद्रपूर :- राजुरा – कोरपना सीमेलगत असलेल्या गडचांदूर येथे विद्यापीठ परीक्षा उत्तरपत्रिका संकलन केंद्र सुरू करण्यात यावे, अशी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने मागणी केली असून यासंदर्भात संघटनेने गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नवीन मुंगळे यांना गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनचे जेष्ठ पदाधिकारी प्राचार्य प्रकाश शेंडे, संघटनेचे विभाग समन्वयक डॉ.शरद बेलोरकर, प्रभारी प्राचार्य डॉ. गजानन राऊत, डॉ, विशाल मालेकर इत्यादी मान्यवर पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे. Establish an answer script collection center for Gondwana University examinations at Gadchandur

गडचांदूर परिसरामध्ये विदर्भ महाविद्यालय जिवती, राजीव गांधी महाविद्यालय पाटण, प्रभाकर मामुलकर महाविद्यालय कोरपना, शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर आणि महात्मा गांधी महाविद्यालय गडचांदूर अशी एकूण पाच परीक्षा केंद्रे कार्यरत आहेत. सध्यास्थितीमध्ये या सर्व केंद्रावरील उत्तरपत्रिकांचे संकलन चंद्रपूर येथे करण्यात येते. मात्र उपरोक्त महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रापासून चंद्रपूर संकलन केंद्र हे अधिक अंतरावर असल्याने गैरसोयीचे ठरत आहे. या संदर्भात गडचांदूर येथे उत्तरपत्रिका संकलन केंद्र करण्यात यावे अशी मागणी या परिसरातील परीक्षा केंद्रावर कार्यरत मुख्य परीक्षा प्रमुखांनी केली आहे.

प्रत्यक्ष परिस्थिती विचारात घेतल्यास वरील सर्व महाविद्यालये व चंद्रपूर यातील अंतर सुमारे ६० ते ९५ कि.मी. दरम्यान आहे. विशेषतः जिवती येथील परीक्षा केंद्रावर तीन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा देत असल्यामुळे उत्तरपत्रिकांची संख्या लक्षणीय प्रमाणात असते. याशिवाय जिवती ते चंद्रपूर हे अंतर सुमारे ९५ किमी. असून रस्त्याची दयनीय अवस्था व वेळेवर सार्वजनिक वाहतूक बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे उत्तरपत्रिका मोटर सायकलद्वारे वाहून नेण्याची वेळ येते, जे अत्यंत धोकादायक व जोखमीचे आहे. तसेच पाटण, कोरपना, गडचांदूर येथील केंद्रांनाही अशाच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ही सर्व परिस्थिती व समस्या लक्षात घेता गडचांदूर येथे गोंडवाना विद्यापीठाचे उत्तर पत्रिका संकलन केंद्र स्थापन करण्याची मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular